Video :सायली संजीवने लोकप्रियता मिळत असतानाही केले होते असे काम, पाहून बसेल तुम्हाला धक्का !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 01:46 PM2019-07-13T13:46:04+5:302019-07-13T13:48:51+5:30

'काहे दिया परदेस' मालिकेतील मराठमोळी गौरी अर्थात अभिनेत्री सायली संजीव रसिकांच्या मनात घर करून गेली. तिचं वागणं, बोलणं आणि तिच्या भूमिकेतला साधेपणा रसिकांना विशेष भावला.

Video: Actress Sayli Sanjiv Sensuous look in video album, didnt go well wid fans | Video :सायली संजीवने लोकप्रियता मिळत असतानाही केले होते असे काम, पाहून बसेल तुम्हाला धक्का !

Video :सायली संजीवने लोकप्रियता मिळत असतानाही केले होते असे काम, पाहून बसेल तुम्हाला धक्का !

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील 'काहे दिया परदेस' ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती. बनारसचा छोरा शिव आणि मराठमोळी गौरी यांची प्रेमकहानी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. शिवची भूमिका साकारणारा ऋषी सक्सेना आणि गौरीची भूमिका साकारणारी सायली संजीव यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं. 


मालिकेतील मराठमोळी गौरी अर्थात अभिनेत्री सायली संजीव रसिकांच्या मनात घर करून गेली. तिचं वागणं, बोलणं आणि तिच्या भूमिकेतला साधेपणा रसिकांना विशेष भावला. सायली म्हणजेच गौरी अशी प्रतिमा रसिकांच्या मनात निर्माण झालीय. मात्र तिच्या याच प्रतिमेला छेद देणारा एक व्हिडीओ सध्या रसिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हि़जीओ जुना असला तरी सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ‘मी बावरी’ या गाण्याचा हा व्हिडीओ सध्या साऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरतोय. 


अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता सुशांत शेलार यांच्यावर या व्हिडीओतील गाणं चित्रीत करण्यात आले आहे. यांत सायलीचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत. साडी परिधान केलेल्या सायलीच्या मादक अदा पाहायला मिळत आहे. सायलीच्या हा अंदाज मात्र तिच्या चाहत्यांना रुचलेल्या नाहीत असं दिसतंय. कारण या व्हिडीओतील सायलीच्या मादक अदांना अनेकांनी निगेटीव्ह कमेंट दिल्या आहेत. त्यामुळे रसिकांना त्यांची लाडकी सायली बहुदा ‘गौरी’च्या अवतारातच पाहायला आवडत असावी. 

Web Title: Video: Actress Sayli Sanjiv Sensuous look in video album, didnt go well wid fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.