आपला दमदार अभिनय आणि सोज्वळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी. अभिनयासह नृत्य कलेतही ती पारंगत आहे. वैदेही सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांसोबत संवाद साधत असते. शिवाय स्वतःचे फोटो आणि विचारही सोशल मीडियावर शेअर करते. तिने शेअर केलेला एक फोटो सध्या रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. 
विविध अंदाजातील तिचे फोटो रसिकांना नेहमीच भावतात. या ड्रेसमध्ये वैदेहीचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसत आहे.

या फोटोवर वैदेहीच्या फॅन्स आणि रसिकांकडून लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. वैदेहीने 'वेड लागी जीवा' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती 'वजीर' चित्रपटातही झळकली होती. 

'काशिनाथ घाणेकर'' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेही परशुरामीने रसिकांची मनं जिंकली. काही महिन्यांपूर्वी रुपेरी पडद्यावर झळकलेल्या 'सिम्बा' चित्रपटात तिने रणवीर सिंहच्या बहिणीची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिकाही रसिकांना भावली होती. 

Web Title: Vaidehi Parshurami look gorgeous in red saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.