उर्मिला निंबाळकरचं मान्सून सेलिब्रेशन !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2017 07:25 AM2017-06-27T07:25:24+5:302017-06-27T12:55:24+5:30

पावसाळा आणि मान्सून प्रत्येक जण आपापल्या परीने सेलिब्रेट करत असतो. बरसणा-या पाऊसधारांमुळे सारं वातावरण रोमँटिक बनतं.पावसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी आणि ...

Urmila Nimbalkar Monsoon Celebration! | उर्मिला निंबाळकरचं मान्सून सेलिब्रेशन !

उर्मिला निंबाळकरचं मान्सून सेलिब्रेशन !

googlenewsNext
वसाळा आणि मान्सून प्रत्येक जण आपापल्या परीने सेलिब्रेट करत असतो. बरसणा-या पाऊसधारांमुळे सारं वातावरण रोमँटिक बनतं.पावसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी आणि रोमँटिक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही वेगळी गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो.कुणी समुद्र किनारी जाऊन पावसाचं सेलिब्रेशन करतं तर कुणी पिकनिकचा प्लॅन करतात.प्रत्येकाच्या त-हा वेगवेगळ्या असल्या तरी सा-यांचे सेलिब्रेशनचे एकच कारण असते ते म्हणजे पावसाचं सेलिब्रेशन.सामान्यांसह सेलिब्रिटी मंडळीसुद्धा पाऊस आणि मान्सूनचे सेलिब्रेशन करतात. या सेलिब्रेशनमध्ये सेलिब्रिटींचा उत्साहसुद्धा वाखाणण्याजोगा असाच असतो. असाच काहीसा उत्साह छोट्या पडद्यावरील अभिनेत्री उर्मिला निंबाळकरचा पाहायला मिळाला. विकेंडला पावसाने मुंबापुरीला चिंब केलं. विकेंडला पाऊस आल्यानं त्याच्या सेलिब्रेशनचं वेगळं निमित्तच उर्मिलाला मिळालं. तिनं आपल्या शुटिंगच्या बिझी शेड्युलमधून पावसाचे सेलिब्रेशन करायचं ठरवलं. पावसाळी वातावरणात तिनं तिचे आवडते रोल्स ऑर्डर केले. स्नॅक्स म्हणजे उर्मिलाचा जणू काही जीव की प्राण. त्यामुळे रोल्स हाती येताच तिचा चेहरा चांगलाच खुलला. याचा फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केला. यावेळी तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पावसाळी वातावरण आणि सोबतीला रोल्सच्या ट्रीटसंगे उर्मिलानं जोरदार मान्सून सेलिब्रेशन केलं असं म्हणायला काही हरकत नाही. उर्मिला निंबाळकर ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री असून विविध मालिकांमध्ये तिनं आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. दिया और बाती, इक तारा, मेरी आशिकी तुमसे ही या मालिकेत तिनं काम केलं आहे. उर्मिलाची छोट्या पडद्यावर 'दुहेरी' मालिका ही गाजत आहे. 

Web Title: Urmila Nimbalkar Monsoon Celebration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.