'माझ्या बायकोचा प्रियकर' सिनेमाच्या संगीत व ट्रेलरचे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 1970 06:03 AM1970-01-01T06:03:38+5:302018-11-01T06:00:00+5:30

'माझ्या बायकोचा प्रियकर' या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला.

Unveiling the music and trailer of 'Mazya Baykocha Priyakar' Movie | 'माझ्या बायकोचा प्रियकर' सिनेमाच्या संगीत व ट्रेलरचे अनावरण

'माझ्या बायकोचा प्रियकर' सिनेमाच्या संगीत व ट्रेलरचे अनावरण

googlenewsNext
ठळक मुद्दे 'माझ्या बायकोचा प्रियकर' चित्रपट २३ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

राजकला मुव्हीज अॅण्ड बाबा मोशन पिक्चर्स प्रा. लि.या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेल्या 'माझ्या बायकोचा प्रियकर' या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. यावेळी दीपक रुईया, राजेंद्र गोयंका, प्रदीप के शर्मा, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा, अक्षय जंयतीलाल गाडा, रेश्मा कडाकिया, कौशल कांतीलाल गाडा, निरज गाडा, व्हिडिओ पॅलेसचे नानूभाई, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, भाग्यश्री मोटे, भारत गणेशपुरे, प्रिया गमरे, मीरा जोशी यांच्यासह सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. नुकतेच लग्न झालेल्या दाम्पत्याची लग्नानंतरची गोष्ट आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे. हॉरर कॉमेडी अशा जॉनरचा हा सिनेमा आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अनिकेत विश्वासराव व प्रियदर्शन जाधव या दोघांची प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.

अनेक हिंदी व मराठी सिनेमांचे दिग्दर्शन करणारे राजीव एस. रुईया यांनी सिनेमाची कथा लिहिली असून दिग्दर्शनही केले आहे. या सिनेमाच्या ट्रेलरसोबत सिनेमातील गाणीही यावेळी प्रदर्शित करण्यात आली आहेत. या सिनेमात एकूण चार गाणी आहेत. स्वाती शर्मा व नकाश अझीझ यांच्या आवाजातील 'तू हाथ नको लावूस' या पहिल्या गाण्याला सोशल मीडियावर चार लाख व्हियूज आहेत. या गाण्याला राजू सरदार यांचे संगीत लाभले आहे. 'मी तुझीच साजणा' हे सिनेमातील दुसरे गाणे असून ते अनिकेत व भाग्यश्री व चित्रित करण्यात आले आहे. स्वाती शर्मा यांनी हे गाणे गायले आहे. तर 'जवळ ये ना' हे अनिकेत व भाग्यश्रीवर चित्रित करण्यात आलेले तिसरे रोमँटिक गाणे आहे. या गाण्याला स्वाती शर्मा व सुशांत दिवगीकर स्वरबद्ध केले आहे. या दोन्ही गाण्यांचे बोल अभय इनामदार यांनी लिहिले असून त्या गीतांना विवेक किर यांनी संगीतबद्ध केले आहे. 'गंगे' हे सिनेमातील चौथे गाणे असून त्याचे बोल सुरेश पिल्लई यांनी लिहिले असून त्यांनीच स्वरबद्ध केले आहे. या गीताला प्रभाकर नलावडे यांनी संगीत दिले आहे. प्रियदर्शन व अनिकेतसोबत भाग्यश्री मोटे, प्रिया गमरे, भारत गणेशपुरे, स्वाती पानसरे, अंशुमन विचारे, पदम सिंह, अनुपम ताकमोघे, सुरेश पिल्लई यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाची पटकथा अभिजित गाडगीळ तर संवाद संदीप दंडवते यांनी लिहिली आहे. दीपक रुईया, राजेंद्र गोयंका, प्रदीप के शर्मा, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा, अक्षय जंयतीलाल गाडा हे निर्माते आहेत. तर रेश्मा कडाकिया, कौशल कांतीलाल गाडा, निरज गाडा हे सहनिर्माते आहेत.या सिनेमाचे पेन मुव्हीज हे प्रस्तुतकर्ता असून येत्या २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.  

Web Title: Unveiling the music and trailer of 'Mazya Baykocha Priyakar' Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.