Trailer launches "Ye Re Ye Ye Paisa 2", meet Rasik on this date | "ये रे ये रे पैसा २" चा ट्रेलर लाँच, या तारखेला रसिकांच्या भेटीला
"ये रे ये रे पैसा २" चा ट्रेलर लाँच, या तारखेला रसिकांच्या भेटीला

मराठीत दिवसेंदिवस वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. एखाद्या हिंदी सिनेमा प्रमाणेच मराठी सिनेमाही भव्यदिव्य बनत आहे. लंडननध्ये चित्रीकरण, महागड्या गाड्या आणि हेलिकॉप्टर्सचा तामझाम, धडाकेबाज अॅक्शन सिक्वेन्स, तगडी स्टारकास्ट आणि खटकेबाज संवाद. हे सगळं हिंदी सिनेमात पाहायला मिळतं. "ये रे ये रे पैसा २" या मराठी  चित्रपटात अशीच भव्यता आता मराठी सिनेमातही पाहायला मिळणार आहे. 


या चित्रपटाचा दमदार ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. कर्ज बुडवून पळून गेलेला उद्योजक आणि त्याचा शोध घेणाऱ्या अण्णा आणि त्याचे अतरंगी साथीदार यांची गोष्ट "ये रे ये रे पैसा २" मध्ये पहायला मिळणार असल्याचं या ट्रेलरमधून दिसतं. मात्र चित्रपटाच्या रंगतदार कथानकासह लक्ष वेधून घेतात ते खटकेबाज संवाद. अनेक टाळीबाज आणि  हसून हसून लोटपोट करायला लावणारे संवाद आणि प्रसंग ट्रेलरमध्ये दिसतात . तर आजपर्यंत मराठी चित्रपटात न दिसलेली भव्यता आणि चकचकीतपणाही या चित्रपटात असल्याचे सांगण्यात  येत आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीचं कुतूहल आता आणखीच वाढलं आहे. हृषिकेश कोळीने पटकथा संवाद लेखन केलं आहे. 


या चित्रपटात अभिनेता संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. गायक  अवधूत गुप्ते,  मुग्धा कऱ्हाडे, शाल्मली खोलगडे आणि मिक्का सिंग यांनी या चित्रपटातील गाणी  गायली आहेत. येत्या ९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


Web Title:  Trailer launches "Ye Re Ye Ye Paisa 2", meet Rasik on this date
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.