नागराज मंजुळेचा जुना फोटो होतोय व्हायरल, आधीचा लूक आणि आताचा लूक पाहून तुम्हीही चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 12:19 PM2021-06-15T12:19:12+5:302021-06-15T12:22:02+5:30

मराठी चित्रपटसृष्टीत शंभर कोटींची कमाई करून नवा इतिहास रचणारा चित्रपट म्हणजे सैराट. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाने रसिकांना जणू काही याड लावलं होतं.

Then and now: You Will Amazed To See Sairat Fame Director Nagraj Manjule Old Pic | नागराज मंजुळेचा जुना फोटो होतोय व्हायरल, आधीचा लूक आणि आताचा लूक पाहून तुम्हीही चक्रावून जाल

नागराज मंजुळेचा जुना फोटो होतोय व्हायरल, आधीचा लूक आणि आताचा लूक पाहून तुम्हीही चक्रावून जाल

googlenewsNext

सेलिब्रिटींवर फॅन्स जीव ओवाळून टाकतात. सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यामातून आपल्या फॅन्सशी कनेक्ट झाले आहेत. या माध्यमातून दोघांनाही संवाद साधण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे. इतकचे काय तर सोशल मीडियामुळे आवडत्या कलाकराविषयी प्रत्येक गोष्ट पटकन समजते. सेलिब्रेटी त्यांच्या प्रोजेक्टची माहिती व्हिडीओ फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात. 

सेलिब्रेटींचे जसे नवीन फोटो पाहून चाहते पसंती देतात तसे त्यांच्या जुन्या फोटोंना देखील तितकीच पसंती मिळत असते. नेहमीच सेलिब्रेटी त्यांचे जुने फोटो शेअर करत आठवणींना ऊजाळा देताना दिसतात. सध्या अशाच एका लाडक्या कलाकाराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अगदी करिअर सुरुही झाले नव्हते त्या काळातला हा फोटो असावा. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये कलाकाराची वेगळी ओळख करुन द्यायला नको. कारण चाहते त्याची झलक पाहूनच त्याला ओळखतात.

मराठी चित्रपटसृष्टीत शंभर कोटींची कमाई करून नवा इतिहास रचणारा चित्रपट म्हणजे सैराट. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाने रसिकांना जणू काही याड लावलं होतं. सैराटसह नागराजच्या पिस्तुल्या ही शॉर्टफिल्म आणि फँड्री चित्रपटावरही रसिकांनी भरभरून प्रेम केलं आणि पसंती दिली. एक संवेदनशील दिग्दर्शक अशी नागराजची ओळख बनलीय. 

 'सैराट' फेम दिग्दर्शक नागराज मंजुळेचे आज जगभरात चाहता वर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे नागराज मंजुळेशी निगडीत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात चाहत्यांनाही तितकाच रस असतो. जुना फोटोपाहून चाहते काहीसे आश्चर्यचकीत होत आहेत. कारण नागराज मंजुळेने त्यांच्या लूकवरही चांगलीच मेहनत घेत नवीन लूक मिळवला आहे.  

Web Title: Then and now: You Will Amazed To See Sairat Fame Director Nagraj Manjule Old Pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.