ठळक मुद्देटकाटक या चित्रपटात अभिजीत-प्रणाली या जोडीवर “या चंद्राला या...’’ हे रोमँटिक गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. यातील चंद्राची शीतलता आणि अभिजीती-प्रणालीचा हॉट अंदाज प्रेक्षकांना घायाळ करणारा आहे.

रूपेरी पडद्यावर नेहमीच नवनवीन जोड्या जुळत असतात. कित्येकदा जुन्याच जोडया नव्याने हिट होत प्रेक्षकांचे मनोरंजन करतात, पण नवीन जोड्यांचे आकर्षण काही वेगळेच असते. ‘येडयांची जत्रा’, ‘4 इडियट्स’, ‘जस्ट गंमत’, ‘शिनमा’ आणि ‘1234’ असे मनोरंजक चित्रपट बनवत प्रेक्षकांची वाहवा मिळवणारे दिग्दर्शक मिलिंद कवडे मागील बऱ्याच दिवसांपासून एका अशा चित्रपटामुळे चर्चेत आहेत, जो मराठी प्रेक्षकांना आश्चर्याचा सुखद धक्का देणारा ठरणार आहे. मिलिंद यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘टकाटक’ या चित्रपटाचं पोस्टर आणि ट्रेलर रिलीज झाला असून आज सगळीकडे त्याचीच चर्चा आहे. 

टकाटक या चित्रपटात प्रेक्षकांना अभिजीत आमकर आणि प्रणाली भालेराव यांच्यावर शूट करण्यात आलेलं एक रोमँटिक साँग पाहायला मिळणार आहे. पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि गांववाला क्रिएशन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘टकाटक’ या चित्रपटात मिलिंद यांनी सेक्स कॉमेडी हा प्रकार हाताळला आहे. 28 जूनला प्रदर्शित होणाऱ्या ‘टकाटक’ची निर्मिती ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदरजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे यांनी केली आहे. मराठीत अशा प्रकारच्या चित्रपटांची संख्या फार कमी असली तरी यात अश्लील काहीही नसल्याने परीपूर्ण मनोरंजक चित्रपट म्हणून टकाटककडे पहाणे गरजेचे आहे. या चित्रपटात अभिजीत आणि प्रणाली या नव्या कोऱ्या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे. 

टकाटक या चित्रपटात अभिजीत-प्रणाली या जोडीवर “या चंद्राला या...’’ हे रोमँटिक गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. यातील चंद्राची शीतलता आणि अभिजीती-प्रणालीचा हॉट अंदाज प्रेक्षकांना घायाळ करणारा आहे. गीतकार जय अत्रे यांनी लिहिलेले हे गीत श्रृती राणेने गायलं आहे. या गाण्यातील या दोघांच्या मादक अदा प्रेक्षकांना आवडतील यात काहीच शंका नाही. संगीतकार वरूण लिखते यांनी या गाण्याला स्वरसाज चढवला असून चित्रपटाच्या कथानकात महत्त्वाची भूमिका बजावणारं हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास संगीतकार वरूण लिखते यांनी व्यक्त केला आहे. 

टकाटक या चित्रपटातील आनंद शिंदे यांच्या आवाजातील “आपला हात जगन्नाथ...’’ हे गाणं आधीच हिट झालं आहे. या गाण्याची परंपरा पुढे सुरू ठेवत “या चंद्राला या...’’ हे गाणंही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल असा विश्वास निर्मात्यांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. ‘टकाटक’च्या ट्रेलरविषयी प्रेक्षकांच्या मनात कुतूहल होतं. त्यामुळेच अल्पावधीतच या चित्रपटाच्या ट्रेलरने व्ह्यूजचा उच्चांक गाठला आहे. “या चंद्राला या...’’ हे गाणंही तोच कित्ता गिरवण्यात यशस्वी होईल. चित्रपटाचा जॉनर जरी सेक्स कॉमेडी प्रकारात मोडणारा असला तरी कुठेही थिल्लरपणा किंवा वाह्यातपणा होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आल्याने एक मनोरंजक चित्रपट पाहिल्याचे समाधान प्रेक्षकांना मिळेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. या चित्रपटात अभिजीत-प्रणाली आणि प्रथमेश-रितीका या दोन जोड्यांसोबतच भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर आदी कलाकारही आहेत. 

English summary :
Takatak Movie: Romantic song released from takatak movie. ya chandrala ya is the name of the song. The 'Takatak', which is releasing on 28 June,


Web Title: Takatak marathi movie ya chandrala ya song released
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.