स्वप्निल जोशीच्या समांतर वेबसिरिजचे फॅन असाल तर ही बातमी नक्कीच वाचा, आहे तुमच्यासाठी गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 06:11 PM2020-06-09T18:11:20+5:302020-06-09T18:12:34+5:30

समांतर या वेबसिरिजमध्ये स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित, नितिश भारद्वाज यांच्या मुख्य भूमिका होत्या. या वेबसिरिजचा पहिला सिझन प्रचंड गाजला होता.

swapnil joshi will start shoot for samantar web series from July | स्वप्निल जोशीच्या समांतर वेबसिरिजचे फॅन असाल तर ही बातमी नक्कीच वाचा, आहे तुमच्यासाठी गुड न्यूज

स्वप्निल जोशीच्या समांतर वेबसिरिजचे फॅन असाल तर ही बातमी नक्कीच वाचा, आहे तुमच्यासाठी गुड न्यूज

googlenewsNext
ठळक मुद्देस्वप्निलच्या समांतर या वेबसिरिजचे चित्रीकरण जुलैमध्ये सुरू होणार आहे. आजपर्यंतच्या मराठी वेबच्या इतिहासातील ‘समांतर’ ही वेबसिरिज सर्वाधिक प्रेक्षकांनी पाहिलेली वेबसिरिज बनली होती.

‘समांतर’ या वेबसिरिजला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. या वेबसिरिजमध्ये स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित, नितिश भारद्वाज हे मुख्य भूमिकेत होते. या वेबसिरिजची कथा, कलाकारांचे अभिनय सगळे काही प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. कुमार महाजनचे भविष्य सुदर्शन चक्रपाणी या माणसाशी कसे जोडले गेले आहे आणि आपले भविष्य जाणून घेण्यासाठी कुमार महाजन सुदर्शन चक्रपाणी या व्यक्तीपर्यंत कसा आणि कोणकोणत्या संकटाना समोर जात पोहोचतो हा सगळा प्रवास प्रेक्षकांना या वेबसिरिजमध्ये पाहायला मिळाला होता. 

कुमार महाजन आणि चक्रपाणी यांच्या भेटीनंतर अनेक गोष्टींचा उलगडा होईल असे प्रेक्षकांना वाटले होते. पण पहिल्या सिझनमध्ये काही गोष्टींची उत्तरं देणं हे निर्मात्यांनी टाळले आहे. त्यामुळे प्रेक्षक आतुरतेने गेल्या काही दिवसांपासून या वेबसिरिजच्या दुसऱ्या सिझनची वाट पाहात आहेत. आता या वेबसिरिजच्या फॅन्ससाठी खूप चांगली बातमी आहे. या वेबसिरिजचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेबसिरिजबाबत एक महत्त्वाची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

स्वप्निलच्या समांतर या वेबसिरिजचे चित्रीकरण जुलैमध्ये सुरू होणार आहे. आजपर्यंतच्या मराठी वेबच्या इतिहासातील ‘समांतर’ ही वेबसिरिज सर्वाधिक प्रेक्षकांनी पाहिलेली वेबसिरिज बनली होती. त्यामुळे या वेबसिरिजच्या दुसऱ्या सिझनला देखील प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळणार यात काहीच शंका नाही.

Web Title: swapnil joshi will start shoot for samantar web series from July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.