स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोशूटचे आणि इतरही काही फोटो ती शेअर करत असते. स्वानंदीने सोशल मीडियावर तिचा फोटोशूट शेअर केले आहे. यात पांढऱ्या रंगाच्या टॉपमध्ये स्वानंदी एका भिंतीला टिकून उभी दिसते आहे. या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस लूक पाहावयास मिळतो आहे. या फोटोसोबत स्वानंदीने, तू रूह है तो मैं काया बनू ता-उम्र मैं तेरा साया बनू, कह दे तो बन जाऊं बैराग मैं कह दे तो मैं तेरी माया बनू, तू साज़ है, मैं रागिनी तू रात है, मैं चांदनी! असे कॅप्शन दिले आहे.  हा फोटो पाहून अनेक लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव तिच्या फोटोवर होत आहे.


सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी बॉलिवूडमधील स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. आपल्या पालकांपेक्षा हम भी कुछ कम नहीं असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत.


आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलं मुलीसुद्धा अभिनय क्षेत्रात एंट्री मारणं ही काही नवी बाब राहिली नाही. असेच काही मराठी चित्रपटसृष्टीतही पाहायला मिळते आहे. यात मराठीतील स्टार किडच्या यादीत लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डेचे नाव आघाडीवर आहे.
स्वानंदी बेर्डेने 'रिस्पेक्ट' या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. किशोर बेळेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात सात महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे.

Web Title: Swanandi berde look glamorous photo on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.