कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि कसदार अभिनयाच्या जोरावर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चतुरस्त्र अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली. करियरमध्ये कितीही चढउतार आले तरी तो डगमगला नाही आणि अवघं जगं जिंकून घेतल्याप्रमाणे साऱ्यांचा ‘लाडका लक्ष्या’ म्हणून त्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलं. साऱ्याचा लाडका लक्ष्या अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सिनेमाच्या या रंगीत दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर मराठी सिनेमाच नाही तर नाटक आणि हिंदी सिनेमातूनही स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवत अनेक भूमिका अजरामर केल्या. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला आणि त्यांच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला होता. त्यांचे निधन झाले त्यावेळी त्यांनी दोन्ही मुले अभिनय आणि स्वानंदी खूपच लहान होते. त्यांची पत्नी प्रिया बेर्डे यांनी एकटीने त्या दोघांचा सांभाळ केला. स्वानंदीने नुकताच साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत ती खूप गोड दिसतेय.

आज अभिनयने आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. त्याच्या ती सध्या काय करते या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले होते. त्याचा अभिनय, नृत्य प्रेक्षकांना चांगलेच भावले होते. काही महिन्यांपूर्वी त्याचा रंपाट हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्यासोबत प्रिया बेर्डे आईच्या भूमिकेत होते. 

आता अभिनयनंतर त्याची बहीण स्वानंदी देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. स्वानंदी बेर्डे ही 'रिस्पेक्ट' या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. किशोर बेळेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात सात महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या सातपैकी एका स्त्रीची भूमिका स्वानंदी हिने या चित्रपटात साकारली आहे.

अभिनयपाठोपाठ आता त्याची बहीण स्वानंदीसुद्धा रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. याशिवाय आणखीन एका चित्रपटात ती दिसणार आहे.


Web Title: Swanandi Berde is Laxmikant Berde daughter, she shared photo on instagram
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.