ठळक मुद्देस्वानंदी आणि स्वामिनी या बेस्ट फ्रेंड आहेत

शाहरुख खानची मुलगी सुहान खान, चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि संजय कपूर मुलगी शनाया कपूर यांची मैत्री संपूर्ण बी-टाऊनमध्ये फेमस आहे. अनेक ठिकाणी या तिघींना एकत्र स्पॉट केले जाते. मराठी इंडस्ट्रितही दोन दिग्गज अभिनेत्यांच्या मुली एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड आहेत हे तुम्हाला माहिती आहे का ?, दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे जयवंत वाडकर यांचे अतिशय जवळचे मित्र होते हे आपल्याला माहितीच आहे. त्यांच्याप्रमाणेच त्यांच्या लेकीदेखील एकमेकींच्या जवळच्या मैत्रिणी आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी आणि स्वामिनी या बेस्ट फ्रेंड आहेत. दोघींच्याही सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचे एकमेकींसोबतचे फोटो नेहमीच शेअर करत असतात. 


स्वानंदी बेर्डे हिने स्वामिनी सोबतचे फोटो सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी शेअर केले होते. या फोटोवर त्यांच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्स केले होते. 


स्वामिनीने ‘एफयू’ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. तिला अभिनयासोबतच नृत्याचीसुद्धा आवड आहे. स्वामिनी 'अशी ही आशिकी' सिनेमात दिसली होती. तर स्वानंदीच्या डेब्यूची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे.

 स्वानंदी 'रिस्पेक्ट' या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार होती अशी चर्चा होती.   किशोर बेळेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात सात महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या सातपैकी एका स्त्रीची भूमिका स्वानंदी हिने या चित्रपटात साकारली आहे.  


Web Title: Swanandi berde and swamini wadkar are best friends
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.