सुयश-आयुषीच्या साखरपुड्याचा हा नवाकोरा सुंदर व्हिडीओ एकदा पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 05:54 PM2021-09-06T17:54:26+5:302021-09-06T17:58:21+5:30

Suyash Tilak and Aayushi Bhave Engagement Video : होय, काही तासांपूर्वी आयुषीने सारखपुड्याचा एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

suyash tilak and aayushi bhave engagement video | सुयश-आयुषीच्या साखरपुड्याचा हा नवाकोरा सुंदर व्हिडीओ एकदा पाहाच!

सुयश-आयुषीच्या साखरपुड्याचा हा नवाकोरा सुंदर व्हिडीओ एकदा पाहाच!

googlenewsNext
ठळक मुद्देसुयश सध्या ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत काम करतोय. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

अभिनेता सुयश टिळकने (Suyash Tilak ) गेल्या जून महिन्यात साखरपुड्याचे खास फोटो शेअर करत चाहत्यांनाही सुखद धक्का दिला होता.आयुषी भावेसोबत (Aayushi Bhave) साखरपुडा झाल्याची आनंदाची बातमी खुद्द सुयशनेच चाहत्यांना दिली होती. हे साखरपुड्याचे फोटो पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. कारण सुयश कधीच या नात्याबद्दल बोलला नव्हता.
 दाक्षिणात्य थीमवर पार पडलेल्या सुयश व आयुषीच्या साखरपुड्याचे फोटो तुफान व्हायरल झाले होते. आता काय तर या साखरपुड्याचा एक व्हिडीओ असाच व्हायरल होतोय.

होय, काही तासांपूर्वी आयुषीने सारखपुड्याचा एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आयुष्यातील चांगल्या गोष्टी तुझ्या संगतीने आणखीच चांगल्या होतात, असं हा व्हिडीओ शेअर करताना तिनं लिहिलं आहे.
सुशय व आयुषीची भेट एका कार्यक्रमात  झाली होती. पहिल्याच भेटीत दोघांमध्येही खूप चांगली मैत्री झाली होती. बघता बघता दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.  सुयशची होणारी बायको आयुषी अभिनेत्री आणि नृत्यांगणा आहे. युवा डान्सिंग क्वीन या टीव्ही शोमध्ये ती झळकली होती.

लवकरच ‘या गावाचं की त्या गावाचं’ एका आगामी सिनेमात ती दिसणार आहे. हे भावी जोडपं या वर्षाच्या अखेरिस लग्नबंधनात अडकणार आहे.
आयुषी इन्स्टाग्रामच्या माध्यामातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यास विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.

सुयश सध्या ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत काम करतोय. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिका अजून काही दिवस सुरू राहणार असली तरी चित्रीकरण पूर्ण झालं आहे. या मालिकेनंतर सुयश बिग बॉस मराठी 3 मध्ये झळकणार अशी चर्चा आहे. मात्र अशा बातम्यांवर विश्वास ठेऊ नका, असं म्हणत, खुद्द सुयशने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Web Title: suyash tilak and aayushi bhave engagement video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.