लॉकडाऊनदरम्यान रसिकांसाठी खास सुमीत राघवन आणि ऋता दुर्गुळे घेऊन येतायेत स्ट्राबेरी शेक !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 07:00 AM2020-04-15T07:00:00+5:302020-04-15T07:00:00+5:30

अभिनेता सुमीत राघवन आणि महाराष्ट्राची अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांची एक वेगळी केमिस्ट्री आपल्याला पहायला मिळणार आहे.

Sumit Raghvan And Hruta Durgule come together in short film StrawberryShake Releasing On 15th April 2020-SRJ | लॉकडाऊनदरम्यान रसिकांसाठी खास सुमीत राघवन आणि ऋता दुर्गुळे घेऊन येतायेत स्ट्राबेरी शेक !

लॉकडाऊनदरम्यान रसिकांसाठी खास सुमीत राघवन आणि ऋता दुर्गुळे घेऊन येतायेत स्ट्राबेरी शेक !

googlenewsNext

संपूर्ण जगात सध्या कोरोना व्हायरस ने थैमान घातलं आहे . पण त्याची एक चांगली बाजू सुद्धा आहे ती म्हणजे निसर्ग पृथ्वी  स्वतःला रिपेअर करतेय. आणि जोपर्यंत हे सुरु आहे तोपर्यंत सर्वांनीच आपापल्या घरी राहणं सुद्धा महत्वाचं आहे. रसिकांच्या मनोरंजनासाठी खास अवॉर्ड विनिंग शॉर्टफिल्म 'स्ट्रॉबेरी शेक' झी ५च्या माध्यमातून रसिकांना पाहाता येणार आहे. विशेष म्हणजे  अभिनेता सुमीत राघवन आणि महाराष्ट्राची अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांची एक वेगळी केमिस्ट्री आपल्याला पहायला मिळणार आहे.

'स्ट्राबेरी शेक' ही गोष्ट आहे कूल  बाबा आणि त्यांच्या हुशार चिऊची. आजच्या पिढितील  प्रत्येक आईबाबांना  आणि त्यांच्या पिल्लांना ही गोष्ट त्यांची वाटेल यात शंकाच नाही. जेव्हा एक नॉर्मल बाबा आपल्या चिऊ साठी एक 'कूल' बाबा बनण्याचा प्रयत्न करतो  आणि त्याची चिऊ म्हणजे मुलगी सरळ  तिच्या बॉयफ्रेंडलाच घरी घेऊन बाबा समोर उभी करते तेव्हा त्या 'कूल' बाबाची उडणारी तारांबळ आणि पुढे घडणाऱ्या घटना प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. अभिनेता सुमीत राघवनने हा बाबा अतिशय कमाल रंगवला आहे. त्याचबरोबर अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिने एक अतिशय गोड पण त्याचबरोबर स्पष्टवक्ती मुलीचे पात्र खूप सुंदर रित्या दाखवले आहे. 

लेखक व दिग्दर्शक शोनील यल्लातीकर याची ही व्यवसायिक दुसरी फिल्म असून  त्याची विषयावरची घट्ट पकड आणि दिग्दर्शनातील बारकावे या फिल्म मधून प्रेक्षकांना पहायला मिळतील. ऋताच्या बॉय फ्रेंडची भूमिका रोहित फाळके अभिनेत्याने  केली आहे. सुमीत राघवनने याबद्दल सांगितले की, मला यंग एनर्जी बरोबर काम करायला खूप आवडतं कारण त्यांची कल्पना शक्ती कमाल असते . शोनील खूप फोकस्ड असल्याने आणि स्टोरी मला आवडल्याने मी या कामाला होकार दिला. त्याचबरोबर ऋताशी  एक कलाकार म्हणून सुद्धा  सूर उत्तम जुळला. मला वाटते मुलांबरोबर संवाद होणं खूप महत्वाचं असतं आणि हेच आम्ही या स्ट्रॉबेरी शेक द्वारें दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत.

तर ऋता दुर्गळेने सांगितले की, ही शॉर्टफिल्म निवडताना नाही बोलण्याचा प्रश्न नव्हता. उत्तम गोष्ट , शोनील सारखा एक उत्तम  लेखक आणि दिग्दर्शक , सुमीतसारखे एक दिग्गज अभिनेते तुमच्या समोर असल्यावर एका कलाकाराला आणखी काय हवे ? आणि  विषय - ' स्ट्राबेरी शेक' ही आजची गोष्ट आहे. आजच्या पिढीला खूप काही सांगायचं आहे, आजच्या  पिढी कडे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता आहे. मात्र त्याचबरोबर पालकांची साथ सुद्धा त्यांना हवी आहे. मात्र त्यासाठी सध्या घरात संवाद होत नाहीत. हेच आम्ही या शॉर्टफिल्म द्वारे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. 

 

लोमकत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ऋता दुर्गुळे संध्याकाळी ५ वाजता रसिकांशी संवाद साधणार आहे. तुमचेही काही खास प्रश्न असतील थेट ऋताशी तुम्ही प्रश्न विचारून उत्तर जाणून घेऊ शकता. 

Web Title: Sumit Raghvan And Hruta Durgule come together in short film StrawberryShake Releasing On 15th April 2020-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.