लॉकडाउनमध्ये सुबोध भावे करतोय मुलांची हजामत, पहा त्याचा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 12:21 PM2020-04-16T12:21:38+5:302020-04-16T12:22:20+5:30

सुबोध भावेच्या या व्हिडिओला मिळतेय चाहत्यांची पसंती

Subodh Bhave cutting hair of his sons, watch this Video TJL | लॉकडाउनमध्ये सुबोध भावे करतोय मुलांची हजामत, पहा त्याचा हा व्हिडिओ

लॉकडाउनमध्ये सुबोध भावे करतोय मुलांची हजामत, पहा त्याचा हा व्हिडिओ

googlenewsNext

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अख्खा देश ठप्प झाला आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीही ठप्प आहे. सर्वच मालिका व चित्रपटांचे शूटींग बंद आहे. त्यामुळे सर्व कलाकार आपापल्या घरात कैद आहेत. नेहमी कामानिमित्त बिझी असणाऱ्या कलावंतांकडे खूप वेळ आहे. त्यामुळे कुणी घरात राहून कुकिंग करत आहे तर कुणी चित्रकलेची आवड जोपासत आहे. त्यात तर आता चक्क अभिनेता सुबोध भावेचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात तो त्याच्या मुलाचे केस कापताना दिसतो आहे. त्याचा हा व्हिडिओ त्याची बायको मंजिरीने शेअर केला आहे.


सुबोधची पत्नी मंजिरी भावे हिने फेसबुकवर सुबोधचा दोन्ही मुलांची हजामत करतानाचा व्हिडिओ व त्या मुलांचे फोटो शेअर केले आहेत आणि म्हटलं की, आज शेवटी बाबाने हजामत केली.


सुबोधच्या या व्हिडिओ व फोटोला खूप लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. त्यामुळे सुबोधच्या चाहत्यांना त्याची ही भूमिका चांगलीच भावते आहे.


देशात कोरोना व्हायरसने थैमान मांडले आहे. तेव्हापासून सुबोध सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना घरी थांबण्याचे व सुरक्षित राहण्याचे आवाहन करतो आहे.

तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अख्खा देश ठप्प झाला आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीही ठप्प आहे. सर्वच मालिका व चित्रपटांचे शूटींग बंद आहे. अनेक चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. अशात स्टार्स लोकांचे निभवणारे आहे. पण मनोरंजन उद्योगाशी संबंधित हजारो हात सध्या रिकामे आहेत. बँकस्टेज आर्टिस्ट, प्रॉपर्टी बॉइज, मेक अप सहाय्यक, ड्रेसबॉय, स्पॉट बॉइज, सेटिंग बॉइज, तंत्रज्ञ असा अनेकांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गरजूंच्या मदतीसाठी समोर या, असे आवाहन अभिनेता सुबोध भावे याने केले आहे.

 

Web Title: Subodh Bhave cutting hair of his sons, watch this Video TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.