स्पृहा जोशीचा हा फोटो पाहिला? तिचं सौंदर्य पाहून तुम्हीसुद्धा व्हाल फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 02:42 PM2019-08-28T14:42:40+5:302019-08-28T14:45:25+5:30

स्पृहाने शेअर केलेला एक फोटो रसिकांना भावतोय. या फोटोमध्ये स्पृहाचे सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचे दिसत आहे.

Spruha Joshi Shares Her Photo And Thought On Social Media | स्पृहा जोशीचा हा फोटो पाहिला? तिचं सौंदर्य पाहून तुम्हीसुद्धा व्हाल फिदा

स्पृहा जोशीचा हा फोटो पाहिला? तिचं सौंदर्य पाहून तुम्हीसुद्धा व्हाल फिदा

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीची ओळख आहे.. आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत. 'मोरया', 'पैसा पैसा' यासह विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली. नुकताच तिचा 'बाबा' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकला असून तिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. याशिवाय छोट्या पडद्यावरही मालिकांमधून तिने जादू दाखवली आहे. स्पृहा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि कविता तसंच विचार शेअर करत असते. नुकतंच स्पृहाने शेअर केलेला एक फोटो रसिकांना भावतोय. या फोटोमध्ये स्पृहाचे सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचे दिसत आहे. 


स्पृहाच्या या फोटोत स्मित हास्य, डोळ्यात नवं तेज आणि चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास दिसत आहे. खिडकीतून बाहेर डोकावतानाचा हा फोटो असून खिडकीच्या काचेवर तिचं प्रतिबिंब पाहायला मिळत आहे. माझा आवडता प्रवास म्हणजे खिडकीच्या बाहेर डोकावणं असं कॅप्शन स्पृहाने या फोटोला दिले आहे. या फोटोवर स्पृहाच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू आहे. 

काही दिवसांपूर्वी असाच फोटो स्पृहाने शेअर केला होता. पहिल्या पावसाची मजा काही औरच असते. पहिला पाऊस, त्यानंतर येणारा मातीचा सुगंध प्रत्येकाला वेगळाच आनंद देऊन जातो. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटी मंडळीही पहिल्या पावसाचा आनंद घेतात. स्पृहा जोशी हिनंही पहिल्या पावसाचा आनंद घेतला. आपल्या घराच्या खिडकीतून पहिल्या पाऊसधारांचा आनंद घेत असल्याचा फोटो स्पृहाने सोशल मीडियावर शेअर केला होता.स्पृहा एक कवयित्रीसुद्धा आहे. त्यामुळे पहिला पाऊस तिच्यासाठी नक्कीच खास आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीची ओळख आहे.. आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत.

Web Title: Spruha Joshi Shares Her Photo And Thought On Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.