नवरात्री निमित्त अभिनेत्री रुपाली भोसलेने केले स्पेशल फोटोशूट, दुर्गा अवतारात दिल्या शुभेच्छा

By तेजल गावडे | Published: October 17, 2020 02:52 PM2020-10-17T14:52:03+5:302020-10-17T14:52:45+5:30

नवरात्री निमित्त अभिनेत्री रुपाली भोसलेने स्पेशल फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.

Special photoshoot done by actress Rupali Bhosale on the occasion of Navratri, best wishes in Durga Avatar | नवरात्री निमित्त अभिनेत्री रुपाली भोसलेने केले स्पेशल फोटोशूट, दुर्गा अवतारात दिल्या शुभेच्छा

नवरात्री निमित्त अभिनेत्री रुपाली भोसलेने केले स्पेशल फोटोशूट, दुर्गा अवतारात दिल्या शुभेच्छा

googlenewsNext

आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. नवरात्रीचा आजचा पहिला दिवस म्हणजेच पहिली माळ,म्हणूनच अभिनेत्री रुपाली भोसले हिने आजचा पहिला लूक शेअर केला आहे. तिने दुर्गा अवतारातील फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

रुपाली भोसले हिने नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा पहिला लूक शेअर केला आहे. या फोटोत ती दुर्गा देवीच्या अवतारात दिसते आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, नवरात्रीच्या शुभेच्छा. देवी दुर्गाची शक्ती प्रत्येक महिलेत असते.

रुपालीच्या या गेटअपसाठी कॉश्च्युम आणि स्टाइल बेन्झ फॅशन (तान्या)ने केली आहे. मेकअप मनिषा कोलगेने केला आहे. तर तिचा हा अवतार राहुल महाडीकने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. लाइट्सची जबाबदारी अभि वरे फोटोग्राफी आणि अमोल जाधव फोटोग्राफरनी पेलली आहे. 

रुपाली भोसलेच्या या दुर्गा अवतारातील फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. रुपाली सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो शेअर करत असते. 


रुपाली भोसलेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर रुपाली भोसले सुमीत राघवनसोबतची 'बडी दूर से आये है' ही मालिका प्रचंड गाजली होती. यानंतर रुपाली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात झळकली.

रुपालीने मराठी मालिकांव्यतिरिक्त हिंदी मालिकेत काम केले आहे. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेत काम करते आहे. या मालिकेत ती संजनाच्या भूमिकेत झळकते आहे. 

Web Title: Special photoshoot done by actress Rupali Bhosale on the occasion of Navratri, best wishes in Durga Avatar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.