सोनाली कुलकर्णी कुणाल बेनोडेकरसोबत यावर्षी अडकणार विवाहबंधनात?, अशी झाली होती पहिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 12:28 PM2021-05-18T12:28:53+5:302021-05-18T12:29:20+5:30

सोनालीने तिच्या वाढदिवशी म्हणजे बरोबर एक वर्षापूर्वी तिच्या साखरपुड्याची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली होती.

Sonali Kulkarni to tie the knot with Kunal Benodekar this year? | सोनाली कुलकर्णी कुणाल बेनोडेकरसोबत यावर्षी अडकणार विवाहबंधनात?, अशी झाली होती पहिली भेट

सोनाली कुलकर्णी कुणाल बेनोडेकरसोबत यावर्षी अडकणार विवाहबंधनात?, अशी झाली होती पहिली भेट

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा आज ३३वा वाढदिवस साजरा करते आहे. मराठी चित्रपटसृष्टील मागील वर्षभरात बरेच सेलिब्रेटी विवाहबंधनात अडकले आहेत. मागील वर्षी सोनाली कुलकर्णीचा साखरपुडा पार पडला होता. त्यामुळे ती कधी लग्न करणार आहे, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागील वर्षी कुणाल बेनोडेकर याच्यासोबत साखरपुडा पार पडला. हा साखरपुडा २ फेब्रुवारी २०२० ला दुबईत पार पडला होता. पण सोनालीने तिच्या वाढदिवशी म्हणजे बरोबर एक वर्षापूर्वी तिच्या साखरपुड्याची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली होती.


सोनाली आणि कुणाल लंडनमध्ये नातेवाईकांच्या कार्यक्रमात भेटले होते. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. कुणालने सोनालीला आधी प्रपोज केले होते. त्यानंतर सोनालीने त्याला होकार दिला.


कुणाल हा दुबईत एका मोठ्या हुद्दयावर वित्तीय अधिकारी म्हणून काम करतो. कुणालचे कुटुंब लंडनमध्ये राहतात तर सोनलीचे कुटुंब भारतात असतात. त्यामुळे त्यांनी दुबईत साखरपुडा केला असल्याचे सोनालीने सांगितले होते.


सोनाली आणि कुणालच्या साखरपुड्याला आता वर्ष उलटून गेले आहे. पण अजूनही त्यांनी लग्न केले नसल्यामुळे सोनालीचे चाहते आता तिच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

 
सोनाली कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच झिम्मा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.कोरोनामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलीये.. तर 'छत्रपती ताराराणी' आणि फ्रेश लाईम सोडा हे दोन सिनेमे सुद्धा सोनालीनं साईन केलेत.. ज्याचा फर्स्ट लूक तिनं इंस्टाग्रामवर शेअर करत याबाबत चाहत्यांना माहिती दिली होती.

Web Title: Sonali Kulkarni to tie the knot with Kunal Benodekar this year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.