'साखरपुड्याच्या पलीकडे आणि लग्नाच्या अलीकडे..!', सोनाली आणि कुणालच्या साखरपुड्याला १ वर्ष पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 12:56 PM2021-02-02T12:56:51+5:302021-02-02T12:57:41+5:30

मागील वर्षी याच दिवशी म्हणजे २, फेब्रुवारी, २०२० रोजी दुबईत सोनाली कुलकर्णीचा कुणाल बेनोडेकरसोबत साखरपुडा पार पडला होता.

Sonali and Kunal's engagement completes 1 year | 'साखरपुड्याच्या पलीकडे आणि लग्नाच्या अलीकडे..!', सोनाली आणि कुणालच्या साखरपुड्याला १ वर्ष पूर्ण

'साखरपुड्याच्या पलीकडे आणि लग्नाच्या अलीकडे..!', सोनाली आणि कुणालच्या साखरपुड्याला १ वर्ष पूर्ण

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. नुकतेच अभिज्ञा भावे, मिताली मयेकर, सिद्धार्थ चांदेकर आणि मानसी नाईक हे कलाकार लग्नबेडीत अडकले आहेत. तसेच या वर्षी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीदेखील लग्नबेडीत अडकणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आज सोनाली कुलकर्णीच्या साखरपुड्याला एक वर्ष पूर्ण झाला आहे. तिने नुकतेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले आहेत. 

मागील वर्षी याच दिवशी म्हणजे २, फेब्रुवारी, २०२० रोजी दुबईत सोनाली कुलकर्णीचा कुणाल बेनोडेकरसोबत साखरपुडा पार पडला होता. तिच्या साखरपुड्याला आज एक वर्ष पुर्ण झाले आहेत. यानिमित्ताने सोनाली कुलकर्णीने इंस्टाग्रामवर साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले आहेत आणि म्हटले की, साखरपुड्याच्या पलीकडे आणि लग्नाच्या अलीकडे .


सोनालीने शेअर केलेल्या फोटोत ती पहायला मिळते आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. 


कुणाल दुबईमध्ये राहतो सोनालीने 2 फेब्रुवारी रोजी साखरपुडा केला होता. याबाबत आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोनालीने स्वतः फॅन्ससोबत ही आनंदाची बातमी शेअर केली होती. तिने आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. या फोटोंवरही तुफान शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. तुर्तास साखरपुडा झाला असला तरी लग्नाची तारिख अजुन समोर आलेली नाही.


कुणाल हा मूळचा लंडनचा असून तो दुबईत सिनीयर एडजस्टर म्हणून काम करतो असे समजते आहे.


सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.


नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते. तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. बकुळा नामदेव घोटाळे या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते.

Web Title: Sonali and Kunal's engagement completes 1 year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.