sonalee kulkarni looks beautiful in saree | साडीत खुललं सोनालीचं सौंदर्य, फॅन्स म्हणाले- परी म्हणून की अप्सरा
साडीत खुललं सोनालीचं सौंदर्य, फॅन्स म्हणाले- परी म्हणून की अप्सरा

ठळक मुद्देसाडीत तिच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत

सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे सुरू आहे. ती चित्रीकरणातून वेळ काढून कुठे व्हेकेशनला गेली आहे या प्रत्येक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगत असते. त्यामुळे तिला मोठ्या संख्येने तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. काही दिवसांपूर्वी सोनालीने इन्स्टाग्रामवर एक साडीतला फोटो शेअर केला आहे. साडीने तिच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. जवळपास 61 हजार लाईक्स आतार्यंत या फोटोला मिळाले आहे. 


मध्यंतरीच्या काळात सोनालीचं अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ती रिलेशनशिपमध्ये असल्याचंही बोललं जात होतं. मात्र अशा चर्चा आणि अफवांमुळे सोनाली बरीच वैतागली आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनालीने या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “माझं अफेअर असतं तर ते मी का लपवू असं सोनालीने म्हटले आहे. मात्र यावेळी तिने रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला होता. ज्यावेळी योग्य वेळ येईल आणि पुढचं पाऊल टाकण्याची वेळ येईल त्यावेळी माझ्या जीवनातील त्या व्यक्तीबाबत खुलासा करेन असं सोनालीने म्हटले होते.


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर  येत्या वर्षात तिचे ३ चित्रपट रिलीज होत आहेत. एका चित्रपटात ती किक बॉक्सिंग करताना दिसेल. तसंच एका ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या आणि राजकीयपटातही ती झळकणार आहे. 


Web Title: sonalee kulkarni looks beautiful in saree
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.