अप्सरेनं पतीराजांनाही नाचवलं...! पाहा, सोनाली कुलकर्णीसोबत पती कुणालचा ‘बुरुम बुुरुम’ डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 12:23 PM2022-01-04T12:23:48+5:302022-01-04T12:25:21+5:30

Sonalee Kulkarn Dance Video : नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत सोनालीने सोशल मिडीयावर या गाण्याचा हा व्हिडीओ शेयर केला आणि तो तुफान व्हायरल झाला.

sonalee kulkarni dances with husband kunal on song from film pandu | अप्सरेनं पतीराजांनाही नाचवलं...! पाहा, सोनाली कुलकर्णीसोबत पती कुणालचा ‘बुरुम बुुरुम’ डान्स

अप्सरेनं पतीराजांनाही नाचवलं...! पाहा, सोनाली कुलकर्णीसोबत पती कुणालचा ‘बुरुम बुुरुम’ डान्स

googlenewsNext

झिम्मा आणि पांडू या नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटांना मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद बघता, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni ) जाम आनंदात आहे. पांडू या चित्रपटाने चांगली कमाई केली. झिम्मा हा सिनेमा तर गतवर्षीचा सुपरहिट मराठी सिनेमा ठरला. अशात सेलिब्रेशन तो बनता है ना बॉस... नववर्षाचं निमित्त साधत सोनालीनं पती कुणालसोबत झक्कास सेलिब्रेशन केलं. होय, पांडू या चित्रपटातील ‘बुरुम बुरुम’ या गाजलेल्या गाण्यावर सोनाली व कुणालने धम्माल डान्स केला.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत सोनालीने सोशल मिडीयावर या गाण्याचा हा व्हिडीओ शेयर केला आणि तो तुफान व्हायरल झाला.

नव्या वर्षात सुट्टीची मजा लुटत पती कुणालसोबत सोनालीने या गाण्यावर डान्स केलाय. कुणालनेही सोनालीला छान साथ दिलीय.  सोनाली डान्समध्ये पारंगत आहेच. पण आता तिने कुणालला सुद्धा डान्स शिकवलाय. दोघांचा धम्माल डान्स बघून, नेटकऱ्यांच्याही याच भावना आहेत.

मागली वर्षी 2021 मध्ये सोनाली आणि कुणालने दुबईत लगीनगाठ बांधली होती. कामानिमित्त सोनाली बरेचदा मुंबईत असते, नवरा कुणाल दुबईत आणि सासूसासरे लंडनमध्ये. ख्रिसमसच्या निमित्ताने सोनाली पहिल्यांदा तिच्या सासरी लंडनला गेली होती.
सोनाली कुलकर्णीने ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. आत्तापर्यंत तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.   छत्रपती ताराराणी  आणि फ्रेश लाईम सोडा हे दोन सिनेमे सुद्धा सोनालीनं साईन केले आहेत.

Web Title: sonalee kulkarni dances with husband kunal on song from film pandu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.