मराठी सिनेसृष्टीतील सोनाली कुलकर्णीचं सासर आहे लंडनमध्ये, तिनेच केला हा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 06:02 PM2021-12-25T18:02:57+5:302021-12-25T18:45:27+5:30

मे महिन्यात सोनाली (Sonalee kulkarni) ने कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत लग्नगाठ बंधली.

Sonalee kulkarni celebrating christmas in london with her husband | मराठी सिनेसृष्टीतील सोनाली कुलकर्णीचं सासर आहे लंडनमध्ये, तिनेच केला हा खुलासा

मराठी सिनेसृष्टीतील सोनाली कुलकर्णीचं सासर आहे लंडनमध्ये, तिनेच केला हा खुलासा

googlenewsNext

सध्या सगळीकडे ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षांची धूम आहे. बॉलिवूडपासून मराठी इंडस्ट्रीपर्यंत सगळे ख्रिसमस (Christmas) सेलिब्रेशनमध्ये रंगले आहेत. सोशल मीडियावर ते ख्रिसमस सेलिब्रेट करतानाचे फोटो शेअर करतायेत. मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee kulkarni) देखील ख्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी थेट लंडनला पोहोचली आहे. सोनालीने लंडन एअरपोर्टवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. सोनाली(Sonalee kulkarni)च्या  पत्नीने तिचं एअरपोर्टवर स्वागत केलं आहे.  सोनालीचा पती  कुणाल बेनोडेकर लंडनमध्ये राहतो. सोनाली एका यूजरच्या कमेंटवर उत्तर देताना आपलं सासर लंडनमध्ये असल्याचे सांगितले आहे. 

सोनाली कुणालसोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. मे महिन्यात सोनालीने कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत लग्नगाठ बंधली. कुणाल लंडन इथला असून तो कामानिमित्त दुबईत राहतो.  कुणालचं शिक्षणही लंडनमधल्या 'मर्चंट्स टेलर स्कूल'मध्ये झालं आहे.


लग्नानंतर सोनालीनं दमदार कमबॅक केलंय. सोनालीचा ‘झिम्मा’ हा सिनेमा प्रदर्शित झालाय आणि हाऊसफुल जातोय. याशिवाय ‘पांडू’ हा सिनेमा येत्या 3 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘पांडू’या सिनेमात भाऊ कदम मुख्य भूमिकेत असून कुशल बद्रिकेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तूर्तास सोनाली संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा’ या चित्रपटात बिझी आहे.  2022 च्या दिवाळीत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Sonalee kulkarni celebrating christmas in london with her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.