सई ताम्हणकर चाहत्यांना मोठं सरप्राईज देण्याच्या तयारीत, इन्स्टा पोस्टने वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 10:52 AM2020-10-15T10:52:12+5:302020-10-15T10:53:20+5:30

सई ताम्हणकर सोशल मीडियावर सई खूप अॅक्टीव्हस असते. तिच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट ती सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करत असते. नुकतेच तिने एक पोस्ट शेअर केले आहे.

something new is coming soon posted sai tamhankar | सई ताम्हणकर चाहत्यांना मोठं सरप्राईज देण्याच्या तयारीत, इन्स्टा पोस्टने वेधले लक्ष

सई ताम्हणकर चाहत्यांना मोठं सरप्राईज देण्याच्या तयारीत, इन्स्टा पोस्टने वेधले लक्ष

googlenewsNext

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. बोल्ड आणि बिनधास्त अशी सईची ओळख आहे. सोशल मीडियावर सई खूप अॅक्टीव्हस असते. तिच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट ती सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करत असते. नुकतेच तिने एक पोस्ट शेअर केले आहे. एका पोस्टमध्ये लवकरच नवीन तुमच्या भेटीला येणार असल्याचे तिने म्हटले आहे.

आता नेमकं काय असणार या गोष्टीचा उलगडा तिने केला नसला तरी तिचा नवीन कोणता सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. तर दुस-या पोस्टमध्ये काहीच न लिहीता ब्लँक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे आता या पोस्टचा अर्थ काय ? असाही प्रश्न चाहते तिला विचारताना दिसतायेत. तुर्तास सई जे काही करते ते खासच असते. त्यामुळे लवकचर चाहत्यांना खास सरप्राईज देण्याच्या तयारीत सई आहे हे मात्र नक्की.

करिअरच्या सुरूवातीला अशी दिसायची मराठीची ही सुपर हॉट अभिनेत्री, काळानुसार झाला तिच्यात कमालीचा बदल

नुकतंच तिचे जुने फोटो समोर आले आहेत. सोशल मीडियावरील तिचे जुने फोटो फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. व्हायरल होणारे जुने फोटो आणि तिचे सध्याचे फोटोंमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. स्वतःमध्ये कमालीचा बदल केल्याचे तिच्या जुन्या आणि आताच्या फोटोवरुन सहज कळेल. कारण आता दिसणारी सई आणि पूर्वीची सई यांच्यात जमीन आस्मानाचा फरक होता. याशिवाय वर्कआऊट आणि जीवनातील काही गोष्टी शिस्तीने फॉलो केल्यानेच ती आज मराठीत दिलों की धडकन बनली आहे. सुंदर आणि फीट दिसणं यासाठी सईने खूप मेहनत घेतली आहे. तिच्या या जुने फोटोंनाही फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.

सोनाली कुलकर्णीच्या लग्नाची उत्सुकता लागली तिच्या सहअभिनेत्रींना, दाजींसोबत फोटो केले शेअर

गेल्या काही महिन्यांपासून सोनाली ही दुबईमध्येच होती. या काळात कुणालसोबत किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवताना, किंवा दुबईतील स्थानिक हॉटेलमध्ये भेट देतानाचे अनेक व्हिडीओ सोनाली सोशल मीडियावर शेअर करत होती. मात्र आता ती मुंबईत परतली असून तिच्यासोबत कुणालही इथे आला आहे. सोनाली आणि कुणाल अभिनेत्री सई ताम्हणकरला भेटले. त्यांनी तिघांचा एकत्र फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, जेव्हा दाजी येतात घरी.

Web Title: something new is coming soon posted sai tamhankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.