​सिद्धार्थ चांदेकरने जागवल्या लहानपणीच्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2017 09:49 AM2017-04-24T09:49:03+5:302017-04-24T15:19:03+5:30

सिद्धार्थ चांदेकरने अग्निहोत्र या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेतील त्याची भूमिका गाजल्यावर मराठी इंडस्ट्रीचे दरवाजे त्याच्यासाठी खुले ...

Siddhartha Chandekar's childhood remembered childhood memories | ​सिद्धार्थ चांदेकरने जागवल्या लहानपणीच्या आठवणी

​सिद्धार्थ चांदेकरने जागवल्या लहानपणीच्या आठवणी

googlenewsNext
द्धार्थ चांदेकरने अग्निहोत्र या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेतील त्याची भूमिका गाजल्यावर मराठी इंडस्ट्रीचे दरवाजे त्याच्यासाठी खुले झाले. त्याने झेंडा, बालगंधर्व, सतरंगी रे, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. आज त्याने मराठी चित्रपटसृष्टीत त्याचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. मराठीसोबतच तो काही हिंदी मालिकांमध्येदेखील झळकला आहे.
सिद्धार्थ आज करियरसाठी गेली कित्येक वर्षं मुंबईत राहात असला तरी तो मुळचा पुण्याचा आहे. पुण्यातील कटारिया शाळेत त्याचे शालेय शिक्षण झाले. तर त्यानंतर तो एस.पी कॉलेजमध्ये होता. त्यामुळे पुणे हे शहर त्याच्या खूप जवळचे आहे. या शहराशी जोडलेल्या त्याच्या अनेक आठवणी आहेत.
सिद्धार्थ सध्या गुलाबजाम या त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात तो सोनाली कुलकर्णीसोबत झळकणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. सध्या पुण्यातील विविध भागात या चित्रपटाचे चित्रीकरण केले जात आहे. या चित्रपटाचे नुकतेच चित्रीकरण पुण्यातील अलका टॉकीजमध्ये झाले. या टॉकीजमध्ये सिद्धार्थने आतापर्यंत अनेक चित्रपट पाहिले आहेत. त्याच्या बालपणीच्या अनेक आठवणी या चित्रपटाच्या निमित्ताने जाग्या झाल्या आहेत. सिद्धार्थने याबाबतची पोस्ट फेसबुकवर पोस्ट केली आहे. तो सांगतो, अलका टॉकीजमध्ये मी अनेक चित्रपट पाहिले आहेत. अनेकवेळा पैसा असताना तर काही वेळा पैसा नसतानादेखील इथे चित्रपटांचा आनंद मी घेतला आहे. या चित्रपटगृहासोबत माझ्या अनेक आठवणी आहेत. पण मी या चित्रपटगृहात कधी चित्रीकरण करेन असे मला वाटलेदेखील नव्हते. मी नुकतेच या चित्रपटगृहाच्या बाल्कनीमध्ये चित्रीकरण केले आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा तिकीट न काढता मी तिथे गेलो होतो. या चित्रीकरणासाठी मी सचिन कुंदरकर यांचे आभार मानतो. 

Web Title: Siddhartha Chandekar's childhood remembered childhood memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.