वेलकम होम या चित्रपटात ​सिद्धार्थ मेननसोबत जमणार स्पृहा जोशीची जोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 10:34 AM2017-11-01T10:34:22+5:302017-11-01T16:04:22+5:30

सिद्धार्थ मेनन आणि स्पृहा जोशी यांनी आजपर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या सगळ्याच चित्रपटांची चांगलीच चर्चा झाली आहे. ...

Siddharth Menon joins Sphariha Joshi in Wellcome Home | वेलकम होम या चित्रपटात ​सिद्धार्थ मेननसोबत जमणार स्पृहा जोशीची जोडी

वेलकम होम या चित्रपटात ​सिद्धार्थ मेननसोबत जमणार स्पृहा जोशीची जोडी

googlenewsNext
द्धार्थ मेनन आणि स्पृहा जोशी यांनी आजपर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या सगळ्याच चित्रपटांची चांगलीच चर्चा झाली आहे. आता ते दोघे एकमेकांसोबत काम करण्यास सज्ज झाले आहे. ते दोघे लवकरच एका चित्रपटात झळकणार असल्याचे स्वतः स्पृहाने तिच्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरून सांगितले आहे. तिने फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेचे फोटो पोस्ट करून तिच्या या आगामी प्रोजेक्टविषयी तिच्या फॅन्सना सांगितले आहे.

spruha joshi
स्पृहाने सोशल नेटवर्किंगवर साईटवर दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत लाल रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये आपल्याला स्पृहाला पाहायला मिळत आहे तर दुसऱ्या फोटोत स्पृहा आणि सिद्धार्थ मेनन काहीतरी वाचत असल्याचे दिसून येत आहे. या फोटोंसोबत स्पृहाने कॅप्शन देखील दिली आहे. तिने म्हटले आहे की, माझ्या नवीन चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाले आहे. या नवीन प्रोजेक्टचा भाग मी होत असल्याचा मला खूप आनंद होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित्रा भावे आणि सुनील सुखटणकर करत असून या चित्रपटात मी मोहन आगाशे, सुमीत राघवन, मृणाल कुलकर्णी, उत्तरा बावकर, दिपा श्रीराम, सेवा चौहान, सिद्धार्थ मेनन, सारंग साठ्ये, अश्विनी गिरी, अभय कुलकर्णी यांच्यासोबत काम करत आहे. या सगळ्यांसोबत काम करण्यास मी खूप उत्सुक आहे. या पोस्टसोबत तिने वेलकम होम हा हॅशटॅग दिला आहे. यावरून तिच्या चित्रपटाचे नाव वेलकम होम असल्याचे आपल्याला कळून येत आहे. स्पृहाने पोस्ट केलेल्या या फोटोला अनेक लाइक्स मिळत असून अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहेत.
मला काहीच प्रॉब्लेम नाही या चित्रपटात स्पृहाने नुकतीच मुख्य भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे सगळ्यांनी कौतुक केले होते. या चित्रपटानंतर तिचा आगामी सिनेमा कुठला असणार याबद्दल तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली होती. आता तिनेच तिच्या या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगितल्यामुळे तिचे फॅन्स आतुरतेने तिच्या या चित्रपटाची वाट पाहात आहेत.

Also Read : स्पृहा जोशीचा नवरा वरद लघाटे होता पत्रकार

Web Title: Siddharth Menon joins Sphariha Joshi in Wellcome Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.