Siddharth Jadhav’s unique style statement, shares dashing look photo | सिद्धार्थ जाधवची हटके स्टाईल स्टेटमेंट, डॅशिंग लूक असलेल्या फोटोवर रसिक फिदा
सिद्धार्थ जाधवची हटके स्टाईल स्टेटमेंट, डॅशिंग लूक असलेल्या फोटोवर रसिक फिदा

अभिनेता आणि कॉमेडी किंग म्हणजे सिद्धार्थ जाधव. कॉमेडीच नाही तर आपल्या अभिनय कौशल्याने सिद्धार्थने रसिकांची मनं जिंकली आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदीतही बड्या रणवीर सिंह, अजय देवगणसारख्या बड्या स्टार्स सिद्धूने रुपेरी पडदा गाजवला आहे. रुपेरी पडदा, रंगभूमी आणि छोटा पडदा या तिन्ही माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आपल्या भूमिकांसोबतच सिद्धार्थ त्याच्या हटके स्टाईलमुळे रसिकांचं लक्ष वेधून घेतो. त्याची हटके आणि आकर्षक ड्रेसिंग स्टाईल कायमच रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. 

शूटिंगवर जाणं असो किंवा मग एखाद्या कार्यक्रमात उपस्थित राहणं, दरवेळी सिद्धार्थ आपल्या हटके आणि आकर्षक ड्रेसिंगने रसिकांची मनं जिंकतो. त्यामुळेच की काय नुकतंच त्याने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो रसिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. पूर्णपणे फॉर्मल आणि डॅशिंग लूकमधला फोटो सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिद्धार्थची ही डॅशिंग स्टाईल स्टेटमेंट रसिकांनाही भावली आहे. त्याच्या फॅन्सकडून यावर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू आहे. सिद्धार्थ लवकरच मोहम्मद बर्मावाला दिग्दर्शित लग्न कल्लोळ चित्रपटात झळकणार आहे. बर्मावाला यांचा हा पहिलाच चित्रपट असेल. 


Also Read: सिद्धार्थ जाधववर आली जेनेलिया डिसोझा देशमुखसोबत हात जोडण्याची वेळ


जेनेलिया आणि सिद्धार्थ यांच्यात नुकताच ट्वीटरवर एक मजेशीर संवाद घडला. या संवादाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या संवादाची सुरुवात रितेश देशमुखच्या एका ट्वीटवरून झाली. रितेशने त्याच्या ट्वीटरवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत आपल्याला पाठमोरा रितेश दिसत असून त्याच्या दोन्ही मुलांनी त्याचा हात पकडला आहे. या फोटोसोबत रितेशने लिहिले होते की, जेव्हा आपण फोटोसाठी पोझ देत नाही... तेव्हाच चांगला फोटो येतो. हा फोटो कोणी काढला हे देखील त्याने लिहिले होते. त्याने लिहिले होते की, इन हाऊस फोटोग्राफर... जेनेलिया...


Web Title: Siddharth Jadhav’s unique style statement, shares dashing look photo
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.