Shreyas talpade will seen in welcome to bajrangpura | श्रेयस तळपदे दिसणार 'या' सिनेमात
श्रेयस तळपदे दिसणार 'या' सिनेमात

 श्रेयस तळपदे आणि जॉर्जिया एंड्रियानी यांच्या वेलकम टू बजरंगपूर सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने  श्रेयस आणि जॉर्जिया पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत. 'वेलकम टू बजरंगपूर'चे  निर्माता अंजुम रिझवी आणि आशिष कुमार दुबे एक सामाजिक संदेश देणारा किंवा उत्कृष्ट कॉमेडीची संयोजन देणारे चित्रपट घेऊन येत आहे. आशिष कुमार दुबे यांनी या सिनेमाचे लेखन केले असून दिग्दर्शन सुद्धा तेच करणार आहेत. 

अंजुम रिझवी ह्यांनी 'अ वेडनेसडे', 'अहिस्ता अहिस्ता', 'जॉन डे' सारख्या चित्रपटचे निर्मिती केली आहे. ते म्हणतात, "स्क्रिप्टच्या मागणीनुसार आमच्याकडे परफेक्ट स्टार कास्ट आहे, जॉर्जिया ह्या चित्रपटामध्ये एक एनआरआईची भूमिका साकारणार आहे, श्रेयस तळपदे, संजय मिश्रा, तिगमांशू धुलिया आणि  मोहम्मद अली हे सर्व आपल्या कॉमिक टाईमिंग साठी परिचित आहेत.


नुकतीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली. यावेळी श्रेयस आणि जॉर्जिया उपस्थित होते. जॉर्जियाचे नाव फॅशन जगतात खूप मोठे नाव आहे. तिने ३०हून अधिक फॅशन शो केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचे नाव आहे. आता ती तमीळ वेबसीरिजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करते आहे. 
 

Web Title: Shreyas talpade will seen in welcome to bajrangpura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.