Shreyas talpade share picture with his daughter on daughter day | तैमूर, अबरामला विसरा या मराठमोळ्या अभिनेत्याच्या मुलीचे फोटो एकदा पाहा!
तैमूर, अबरामला विसरा या मराठमोळ्या अभिनेत्याच्या मुलीचे फोटो एकदा पाहा!

नुकताच  डॉटर्स डे सेलिब्रेट करण्यात आला. अनेक सेलिब्रेटींनी आपल्या मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. अभिनेता  श्रेयस तळपदेने  ही आपल्या मुलीसोबतचा फोटो शेअर करत तिला  डॉटर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. या फोटोत श्रेयस, त्याची पत्नी दीप्ती आणि गोड तितकीच निरागस लेक आद्या पाहायला मिळत आहे. यात श्रेयसचे आपल्या लेकीवर असलेले जीवापाड प्रेम पाहायला मिळत आहे. 

लेकीसोबतच्या प्रत्येक फोटोमध्ये श्रेयसमध्ये दडलेला हळवा अन् तितकाच भावनिक बाबा पाहायला मिळत आहे. श्रेयसची जवळीची मैत्रिण सेलिना जेटलीने कमेंट केली आहे. 


श्रेयस आणि दीप्ती हे १३ वर्षांपूर्वी विवाह बंधनात अडकले होते. श्रेयस आणि दीप्ती यांच्या आयुष्यात सरोगसीच्या माध्यमातून आद्याचे आगमन झालं. दीप्ती आणि श्रेयसप्रमाणेच बॉलिवूडमध्ये सनी लिऑन, तुषार कपूर, करण जोहर, आमिर खान, शाहरूख खान या सेलिब्रिटींच्या आयुष्यातही सरोगसीच्या माध्यमातून बाळाचे आगमन झाले आहे.


श्रेयसबाबत बोलायचे झाले तर मराठी चित्रपटसृष्टीद्वारे त्याच्या करियरला सुरुवात केली असली तरी त्याने आज हिंदीत देखील त्याची चांगली ओळख निर्माण केली आहे. ‘गोलमाल’सीरिज, ‘इकबाल’, ‘डोर’ यासारख्या अनेक हिंदी चित्रपटात आणि ‘सावरखेड एक गाव’,‘पछाडलेला’,‘आईशप्पथ’ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये श्रेयसने उत्कृष्ट भूमिका साकारलेल्या आहे. कॉमेडी, गंभीर अशा सगळ्याच भूमिका तो चांगल्याप्रकारे साकारू शकतो हे त्याने त्याच्या अभिनयातून सिद्ध केले आहे. 

Web Title: Shreyas talpade share picture with his daughter on daughter day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.