'लागिरं झालं जी'मधील शीतली आठवतंय का?, आता दिसते आधी पेक्षा अधिक सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 07:00 AM2021-05-12T07:00:00+5:302021-05-12T07:00:02+5:30

'लागीर झालं जी' मालिकेत शिवानी बावकर हिने मोठ्या खुबीने शीतली ही भूमिका साकारली होती.

Shivani baokar look beautiful in blue colour saree | 'लागिरं झालं जी'मधील शीतली आठवतंय का?, आता दिसते आधी पेक्षा अधिक सुंदर

'लागिरं झालं जी'मधील शीतली आठवतंय का?, आता दिसते आधी पेक्षा अधिक सुंदर

googlenewsNext

'लागीर झालं जी' मालिकेत शिवानी बावकर हिने मोठ्या खुबीने शीतली ही भूमिका साकारली होती. या मालिकेत देसी अंदाज तिचा पाहायला मिळाला होता. मालिका संपली तरी शिवानी बालकरने साकारलेली शितलीची भूमिका प्रेक्षक आजही विसरले नाहीत.  सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे नवीन नवीन लूक समोर येते असतात. या फोटोंमध्ये ती दिवसेंदिवस अधिकच सुंदर दिसायला लागल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या ऑनस्क्रीन लूक प्रमाणेच ऑफस्क्रीन लूकलाही तितकीच पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही बरीच एक्टिव्ह असते.

आपले फोटो आणि व्हिडिओ ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. अलीकडेच शिवानीने तिचे साडीतले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले होते.  या फोटोत शिवानी खूपच सुंदर दिसत असल्याचे पाहायला मिळतेय. निळ्या रंगाच्या नवरी साडीत तिचं सौंदर्य आणखी खुलून आले आहे.  फोटोतील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. शिवानीच्या या फोटोला तिच्या फॅन्सकडून बरेच लाइक्स मिळत आहे. 

अभिनय क्षेत्रात येण्याआधी शिवानीने जर्मन ट्रान्सलेटर म्हणूनही एका आयटी कंपनीत काम केले आहे. कॉलेजमध्ये असताना जर्मन भाषा ऑप्शनल म्हणून निवडली होती. ती शिकत असताना शिवानीने ती चटकन आत्मसात केली. शिकताना जर्मन भाषेबाबत आवड निर्माण झाली. त्यामुळे जर्मन भाषा शिकण्याच्या विविध लेव्हल्स तिने पार केल्या. त्यामुळेच मराठी, हिंदी, इंग्रजीप्रमाणेच शिवानी जर्मन भाषाही तितक्याच फाडफाड आणि बिनधास्तपणे बोलू शकते.

Web Title: Shivani baokar look beautiful in blue colour saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.