अभिनेता शरद केळकर हा चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावंत आणि हरहुन्नरी कलाकार आहे. एक उत्तम कलाकार असलेला शरद एक प्रेमळ पिताही आहे. २००५ साली शरद आणि किर्ती केळकर रेशीमगाठीत अडकले. दोघांच्या आयुष्यात त्यानंतर एका गोंडस परीचं आगमन झालं. तिचं नाव या दोघांनी प्रेमानी किशा असं ठेवलं. किशा दोघांच्या जीवनातील अनमोल हिरा आहे. नुकतंच लय भारी अभिनेता शरदने त्याचा लेकीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो पाहून तुम्हीसुद्धा त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहाणार नाही. 


या फोटोमध्ये बाप-लेकीचे प्रेम तुम्हाला पाहायला मिळेल. या फोटोत शरद लेकीच्या गालावर किस करत असल्याचे दिसत आहे. हे पाहून तुम्हीही या फोटोच्या प्रेमात नक्कीच पडाल. माझी राजकुमारी असं कॅप्शन शरदने या फोटोला दिले आहे. हा लयभारी अभिनेता काही दिवसांपूर्वी रुपेरी पडद्यावर झळकलेल्या माधुरी चित्रपटातून रसिकांच्या भेटीला आला होता. स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित हा चित्रपट रसिकांना भावला होता. या चित्रपटात शरदसह सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, संहिता जोशी यांच्या भूमिका होत्या. 


तसेच शरद अक्षय कुमार आणि रितेश देशमुखच्या 'हाऊसफुल ४' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शरद म्हणाला, ''मी नेहमीच काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतो. मला त्याच त्याच भूमिका परत करायला आवडत नाहीत. मला प्रखर भूमिका साकारायला आवडतात.'' रितेश देशमुखसोबत काम करण्याची शरदची ही दुसरीवेळ आहे. याआधी त्यांने रितेशसोबत 'लयभारी' सिनेमात काम केले होते. 

Web Title: Sharad Kelkar Shares Cute Photo With His Daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.