युट्युबवरचा 'शेठ माणूस' आता रुपेरी पडद्यावर; 'या' चित्रपटातून विनायक माळीचं कलाविश्वात पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 11:17 AM2021-09-12T11:17:09+5:302021-09-12T11:19:39+5:30

Vinayak mali : युट्यूब गाजवणाऱ्या या आगरी किंगला रुपेरी पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

'Seth Manus' on YouTube is now on the silver screen; Vinayak Mali's debut in the art world with the film 'Yaa' | युट्युबवरचा 'शेठ माणूस' आता रुपेरी पडद्यावर; 'या' चित्रपटातून विनायक माळीचं कलाविश्वात पदार्पण

युट्युबवरचा 'शेठ माणूस' आता रुपेरी पडद्यावर; 'या' चित्रपटातून विनायक माळीचं कलाविश्वात पदार्पण

googlenewsNext
ठळक मुद्देअभिनेत्री रितिका श्रोतीसोबत विनायक करणार स्क्रीन शेअर

'आगरी किंग' या नावाने घराघरात पोहोचलेला मराठमोळा मुलगा म्हणजे विनायक माळी. आपल्या आगरी भाषेचा वारसा पुढे चालवत विनायक आज सोशल मीडिया सेन्सेशन झाला आहे. 'भाई...', 'शेठ बोल शेठ..', 'असा कुठे असतं का?', अशा काही मोजक्या संवादातून त्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्याचे असंख्य चाहते आहेत. त्यामुळेच युट्यूब गाजवणाऱ्या या आगरी किंगला चाहते रुपेरी पडद्यावर पाहण्यास उत्सुक होते. विशेष म्हणजे चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. विनायक लवकरच एका मराठी चित्रपटात झळकणार असून या चित्रपटाचं पहिलं पोस्टर त्याने शेअर केलं आहे.

विनायक लवकरच एका मराठी चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणार असून अभिनेत्री रितिका श्रोती त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे या फ्रेश जोडीला पहिल्यांदाच एकत्र पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. विशेष म्हणजे चाहत्यांसोबत विनायकचंदेखील रुपेरी पडद्यावर झळकण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

"जी गोष्ट मिळवण्यासाठी मी लहानपणीपासून खूप वाट बघितली ती गोष्ट आज मिळाली डोन्ट वरी गर्लफ्रेंड नाही. ती एक फिल्म आहे आणि ती लवकरच सिनेमागृहात येईल. जेवढं प्रेम मला Youtube वर दिलं आशा करतो तेवढे किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रेम सिनेमागृहात पण मिळेल.MAD in theatres, 2022!!!", अशी पोस्ट शेअर करत विनायकने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

विनायक लवकरच निखिल खजिनदार दिग्दर्शित 'मॅड' या चित्रपटात झळकणार असून हा एका रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपट. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या रोमॅण्टिक चित्रपटाचं लेखन समीर पाटील यांनी केलं आहे.
 

Web Title: 'Seth Manus' on YouTube is now on the silver screen; Vinayak Mali's debut in the art world with the film 'Yaa'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.