सायली संजीवच्या या फोटोंवरून तुमचीही हटणार नाही नजर, SEE PICS

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 07:00 PM2020-10-05T19:00:00+5:302020-10-05T19:00:00+5:30

'काहे दिया परदेस' ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती. तिचं वागणं, बोलणं आणि तिच्या भूमिकेतला साधेपणा रसिकांना विशेष भावला. सायली म्हणजेच गौरी अशी प्रतिमा रसिकांच्या मनात निर्माण झाली होती..

Sayali Sanjeev Surprised Everyone with Her Stunning New Look | सायली संजीवच्या या फोटोंवरून तुमचीही हटणार नाही नजर, SEE PICS

सायली संजीवच्या या फोटोंवरून तुमचीही हटणार नाही नजर, SEE PICS

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील 'काहे दिया परदेस' ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती. बनारसचा छोरा शिव आणि मराठमोळी गौरी यांची प्रेमकहानी रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. शिवची भूमिका साकारणारा ऋषी सक्सेना आणि गौरीची भूमिका साकारणारी सायली संजीव यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं. मालिकेतील मराठमोळी गौरी अर्थात अभिनेत्री सायली संजीव रसिकांच्या मनात घर करून गेली. तिचं वागणं, बोलणं आणि तिच्या भूमिकेतला साधेपणा रसिकांना विशेष भावला.  या मालिकेनंतर सायली म्हणजेच गौरी अशी प्रतिमा रसिकांच्या मनात निर्माण झाली होती.  


सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर तिचे विविध फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. सायलीला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या फोटोंचे तिचे चाहते नेहमीच कौतुक करतात.

नुकतेच एक फोटोशूट केले आहे. ज्यात ती फारच सुंदर दिसतेय. हे फोटोशूट तिच्या फॅन्सना देखील आवडले आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या फोटोंवर फॅन्सनी केला आहे. दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते. तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. 

झी २४ तासने दिलेल्या माहितीनुसार सायली संजीव अभिनेते अशोक सराफ यांची मानलेली मुलगी आहे, अनेकांना ही गोष्टी माहिती नाही तसेच काहींना ही एख अफवा असल्याचे वाटते. मात्र खुद्द सायलीने याविषयीचा खुलासा केला होता. तिने गोष्ट खरी असल्याचं सांगितले होते. 'अशोक सराफ मला त्यांची मुलगी मानतात तर मी त्यांची मानलेली मुलगी आहे हे बऱ्याचं लोकांना माहीत नाही.' असं तिने म्हटले होते. 

फिटनेसबाबतही सायली बरीच सजग असते. आपल्या फॅन्सना फिटनेसबाबत टीप्सही ती देते. योगासनाद्वारे ती स्वतःला फिट ठेवते. विविध आसनं करत ती स्वतःला फिट ठेवते. असंच एक आसन करतानाचा सायलीचा फोटो चर्चेचा विषय ठरला होता.  

 

या फोटोत तिचे खाली डोकं वर पाय केलेत. याचाच अर्थ ती शीर्षासन करत असतानाचा पाहायला मिळत आहे. हा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. 

Web Title: Sayali Sanjeev Surprised Everyone with Her Stunning New Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.