Saurabh Salunkhe Santurki New Song Out | 'मुळशी पॅटर्न' फेम 'सौरभ साळुंखे'च्या पहाडी आवाजात संतुर्कीचं गाणं प्रदर्शित
'मुळशी पॅटर्न' फेम 'सौरभ साळुंखे'च्या पहाडी आवाजात संतुर्कीचं गाणं प्रदर्शित

युट्युब हे माध्यम सध्या प्रत्येकाच्या परिचयाचे झाले आहे. मराठी सिनेमाने तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोणाने देखील उत्तुंग भरारी घेतली आहे आणि याचंच उदाहरण म्हणजे युट्युबवर प्रदर्शित होणार पहिला मराठी वेब सिनेमा "संतुर्की. गोष्ट संत्या सुरकीची!" सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरघोसस प्रतिसाद मिळाल्यानंतर आता चित्रपटाचं गाणं धुमाकूळ घालत आहे. नितीन पवार दिग्दर्शित "संतुर्की...गोष्ट संत्या सुरकीची!" या वेब सिनेमाच्या पार्श्वसंगीताला सुप्रसिद्ध गायक सौरभ साळुंखे यांनी आवाज दिला आहे,पार्श्वसंगीताचे शब्दांकन आणि चाल समीर पठाण तर संगीत संयोजन सचिन - दीपेश यांनी केले आहे. शास्त्रीय संगीत ,ठुमरी, सुफी तसेच भजन यामध्ये मात्तबर असलेले सौरभ साळुंखे यांनी 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं.'

 

मुळशी पॅटर्न सिनेमातील 'आभाळा' , तसेच 'रंपाट', 'बारायण', 'काय झालं कळेना...' अशा बऱ्याच सिनेमांतील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. 
या प्रसंगी गायक सौरभ साळुंखे म्हणाले, ""संतुर्की...गोष्ट संत्या सुरकीची!" या युट्यूबवरील पहिल्या मराठी वेबसिनेमाचा या गाण्याच्या निमित्ताने मलादेखील सहभागी होता आलं ." तसेच"आमच्या वेब सिनेमासाठी सौरभ सारख्या प्रसिध्द आवाज आम्हाला लाभला याचा आम्हाला आनंद होत आहे." असे म्हणत दिग्दर्शक नितीन पवार यांनी आपले मत व्यक्त केले.

सातारा जिल्ह्यातील केळेवाडी गावात जन्मलेल्या वेब सिरीजला जगभरातून प्रेम मिळालं. या वेबसिरीजमध्ये "संत्या आणि सुरकी" हे पात्र सर्वाधिक लोकप्रिय "ठरले आहेत. दोघांच एकमेकांवर जीवापाड प्रेम असूनही काही कारणास्त्व त्याचं लग्न होऊ शकल नाही...लग्न होऊन गेलेली सुरकी पुन्हा संतोष समोर येते तेव्हा त्याची होणारी तगमग...किंवा तिच्या मुलाने "मामा" महटल्यावर होणारी गंमत सगळ्यांना भावली पण याच सोबत सगळ्यांना वेध लागले की इतक जीवापाड प्रेम करणारी ही दोघ एकमेकांपासून वेगळी का झाली...? याचचं  उत्तर 'संतुर्की' सिनेमात आहे.


'संतुर्की' या वेबसिनेमामध्ये संतोष राजेमहाडीक,रश्मी साळवी हे मुख्य भूमिकेत दिसणार असून के.टी.पवार,तृप्ती शेडगे,शुभम काळोलिकर,समाधान पिंपळें हे कलाकार देखील असणार आहे. सिनेमाचे लेखन व दिग्दर्शन नितीन पवार यांनी केल आहे,छायांकन उमेश तुपारे याचं आहे तर कला दिग्दर्शन सुशीलकुमार निगड़े यांनी केल आहे .प्रोडक्शनची बाजू अविनाश पवार यांनी सांभाळली असून १ जुलै २०१९ रोजी हा वेबसिनेमा युट्यूबवर प्रदर्शित होणार आहे. 


Web Title: Saurabh Salunkhe Santurki New Song Out
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.