संस्कृती बालगुडेने शेअर केलं ट्रेडिशनल फोटोशूट, हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 01:30 PM2021-01-25T13:30:32+5:302021-01-25T13:33:34+5:30

'सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत.

Sanskruti balgude looks beautiful in a green dress | संस्कृती बालगुडेने शेअर केलं ट्रेडिशनल फोटोशूट, हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय सुंदर

संस्कृती बालगुडेने शेअर केलं ट्रेडिशनल फोटोशूट, हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय सुंदर

googlenewsNext

सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारणारी संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. आता ती पुन्हा एकदा तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. तिने नवीन फोटोशूटमधील काही फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यातील तिच्या सोज्वळ अदांनी चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे.संस्कृतीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. हिरव्या पानांत, हिरव्या पानांत... पानात ग... पानात ग... असं कॅप्शन तिने या फोटोशूटला दिलं आहे. चाहते  लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी केला आहे.

'सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत.संस्कृती शेवटची 'सर्व लाइन व्यस्त आहेत' या चित्रपटात दिसली होती.या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला.


काही दिवसांपूर्वीच तिच्या '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या सिनेमाचा मुहूर्त पार पडला. संस्कृतीसह या सिनेमात अभिनेता शुभंकर तावडे,शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के अशी दमदार स्टारकास्ट आहे. अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते संगीत दिग्दर्शन करत आहेत.

Web Title: Sanskruti balgude looks beautiful in a green dress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.