ब्लेझरमध्ये ही मराठी अभिनेत्री दिसली हॉट !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 07:15 AM2020-02-29T07:15:00+5:302020-02-29T07:15:00+5:30

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.

Sanskruti balgude look smart in casual wear | ब्लेझरमध्ये ही मराठी अभिनेत्री दिसली हॉट !

ब्लेझरमध्ये ही मराठी अभिनेत्री दिसली हॉट !

googlenewsNext

आपल्या अभिनयाबरोबर आपल्या लूक्समुळे रसिकांची मनं जिंकलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चर्चेत येण्यास कारणीभूत ठरले आहेत तिचं फोटोशूट. तिच्या या फोटोंमधील अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत. सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारणारी संस्कृती सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. मात्र यावेळी तिने ब्लेझरमध्ये फोर्मल फोटोशूट करत सगळ्यांना आश्चार्यचा धक्का दिला. यात ती खूपच सेक्सी दिसतेय. तिच्या या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

तिचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टाईलने संस्कृतीने बालगुडेने रसिकांवर मोहिनी घातली आहे. सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत.

संस्कृती शेवटची 'सर्व लाइन व्यस्त आहेत' या चित्रपटात दिसली होती.या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमात संस्कृती व्यतिरिक्त सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, महेश मांजरेकर, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, राणी अग्रवाल, कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत आणि गौरव मोरे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

Web Title: Sanskruti balgude look smart in casual wear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.