‘वेडिंग चा शिनेमा’चा भन्नाट टीझर पाहा, या सिनेमातून 'हा' गायक करतोय दिग्दर्शनात पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 04:06 PM2019-01-29T16:06:39+5:302019-01-29T16:12:27+5:30

या चित्रपटात प्रमुख भुमिकेमध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हनमगर, योगिनी पोफळे आणि एक नवीन जोडी शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार झळकणार आहेत.

Salil Kulkarni's 'Wedding Cha Shinema' movie teaser out | ‘वेडिंग चा शिनेमा’चा भन्नाट टीझर पाहा, या सिनेमातून 'हा' गायक करतोय दिग्दर्शनात पदार्पण

‘वेडिंग चा शिनेमा’चा भन्नाट टीझर पाहा, या सिनेमातून 'हा' गायक करतोय दिग्दर्शनात पदार्पण

googlenewsNext
ठळक मुद्देमुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे यांच्या मुख्य भूमिका आहेत१२ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे

गेली जवळजवळ वीस वर्ष गायक, संगीतकार, लेखक, परीक्षक, मधली सुट्टी सारख्या कार्यक्रमाचा संकल्पनाकार अशा विविध भूमिकांमधून रसिकांना आनंद देणारा सलील कुलकर्णी आता लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ‘वेडिंग चा शिनेमा’ हा चित्रपट घेऊन आपल्यासमोर येत आहेत. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये ‘माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं ह, कुणी जेवल्यावाचून नाही जायचं ह’ हे लग्नाचे बोल आपणाला ऐकायला मिळतात.    

या चित्रपटात प्रमुख भुमिकेमध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हनमगर, योगिनी पोफळे आणि एक नवीन जोडी शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार झळकणार आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन सलील कुलकर्णी यांचे असून ‘वेडिंग चा शिनेमा’ हा एक निखळ आनंद देणारा एक प्रसन्न अनुभव असणार आहे. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती घेरू आणि पीइएसबी यांनी केली केली असून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात १२ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. 

सलील कुलकर्णी रंगमंचावरून गायला लागला आणि "चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही" म्हणत त्याने आपली मनं जिंकली. संगीतकार म्हणून पस्तीस पेक्षा आधिक चित्रपटाची गाणी केली आणि डीबाडी डीपांग‌ किंवा देही‌ वणवा ‌पिसाटला पासून ते एकटी एकटी घाबरलीस ना पर्यंत त्याने आपल्याला आनंद दिला.   

बा. भ. बोरकर, आरती प्रभू, कुसुमाग्रज ह्यांच्या कवितांची त्याने गाणी केली आणि तरुणांना, तव नयनांचे दल हलले ग.. सारखी गाणी त्यांची वाटली. परीक्षक म्हणून सारे गम किंवा गौरव महाराष्ट्राचा मधून अनेक नवीन गायकांना घडवताना आपण त्याच्या चपखल कमेंट्स ऐकल्या. मधली सुट्टी मध्ये लहान मुलांचा सगळ्यात जवळचा मित्र होताना पाहिलं.  

हे गजवदन.. ते‌ गायेजा.. आणि आनंद शिंदेंच्या मला उडू उडू झालाय पासून आनंद भाटे ह्यांच्या येई गा विठ्ठला पर्यंत ही रेंज थक्क करणारी आहे. लपवलेल्या काचा...शहाण्या माणसांची फॅक्टरी.. सारखी लोकप्रिय पुस्तके सुद्धा आपल्या त्याच्याच मनातून उतरलेली आहेत.  

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या नावावर अनेक हिट मराठी चित्रपटांची नोंद आहे. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाइम प्लीज, मुंबई पुणे मुंबई-२, बापजन्म, आम्ही दोघी आणि मुंबई पुणे मुंबई-३ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती आणि त्यांचे सादरीकरण कंपनीने केले आहे. 

Web Title: Salil Kulkarni's 'Wedding Cha Shinema' movie teaser out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.