सैयामी खेरला माऊली या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मिळाला हा वेगळा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 06:54 PM2018-12-11T18:54:59+5:302018-12-11T18:57:47+5:30

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी माऊलीचे प्रमोशन केवळ मुंबईतच नव्हे तर जोरदाररित्या पूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. प्रमोशनच्या दरम्यान चित्रपटातील सर्व मुख्य कलाकार रितेश देशमुख, जितेंद्र जोशी आणि सिद्धार्थ जाधव यांनी नुकतीच जेजुरी आणि पढंरपुरची वारी केली.

Saiyami kher visited Shirdi and jejuri for mauli movie promotions | सैयामी खेरला माऊली या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मिळाला हा वेगळा अनुभव

सैयामी खेरला माऊली या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मिळाला हा वेगळा अनुभव

googlenewsNext
ठळक मुद्देमाऊली या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री सैयामीला पहिल्यांदाच जेजुरी आणि पंढरपुरला जाण्याचा योग आला. जेजुरीमध्ये खंडोबा आणि पंढरपुरमध्ये विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाने सैयामीला प्रचंड प्रसन्न वाटले. तिच्यासाठी हा अनुभव खूपच चांगला असल्याचे ती सांगते.

अभिनेत्री सैयामी खेरने काहीच वर्षांपूर्वी हिंदी चित्रपट सृष्टीत दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरांच्या मिर्ज़ियाँ या चित्रपटाद्वारे धमाकेदार पदार्पण केले. या चित्रपटानंतर ही हुन्नरी अभिनेत्री रितेश देशमुख अभिनित माऊली या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाद्वारे ती मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या कारकिर्दीला सुरुवात करत आहे. हा चित्रपट १४ डिसेंबर रोजी महाराष्ट्र तसेच परदेशातही प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सध्या रितेश देशमुख आणि सैयामी खेर करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनची एकही संधी ते सोडत नाहीत असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी माऊलीचे प्रमोशन केवळ मुंबईतच नव्हे तर जोरदाररित्या पूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. प्रमोशनच्या दरम्यान चित्रपटातील सर्व मुख्य कलाकार रितेश देशमुख, जितेंद्र जोशी आणि सिद्धार्थ जाधव यांनी नुकतीच जेजुरी आणि पढंरपुरची वारी केली. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री सैयामीला पहिल्यांदाच जेजुरी आणि पंढरपुरला जाण्याचा योग आला. जेजुरीमध्ये खंडोबा आणि पंढरपुरमध्ये विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाने सैयामीला प्रचंड प्रसन्न वाटले. तिच्यासाठी हा अनुभव खूपच चांगला असल्याचे ती सांगते. तिच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची ती आतुरतेने वाट पाहात आहे. 

माऊली या चित्रपटाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. २ मिनिटे ५० सेकंदाचा हा ट्रेलर आहे. या सिनेमात रितेश एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. माऊली सर्जेराव देशमुख असं त्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. या ट्रेलरमध्ये गावातले गुंड धुमाकूळ माजवत असतात त्याचवेळी रितेश म्हणजेच माऊलीची एंट्री होते. इन्स्पेक्टर माऊली सर्जेराव देशमुख म्हणत्यात मला...आपल्या सारखा TERROR नाय.... असा त्याचा डायलॉग आहे. या ट्रेलरला सोशल मीडियावर लाखोंनी व्ह्युज मिळाले आहेत. हा ट्रेलर सलमान खानला देखील भावला होता. त्याने ट्वीटरद्वारे या ट्रेलरचे कौतुक केले होते. तर खुद्द शाहरुख खानने त्याच्या ट्विटर अकाऊंवरून या चित्रपटाचा टीझर शेअर केला होता.

Web Title: Saiyami kher visited Shirdi and jejuri for mauli movie promotions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.