एक नंबर भावा...! परश्याचा हा जबरदस्त VIDEO पाहून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 02:14 PM2022-01-16T14:14:16+5:302022-01-16T14:15:32+5:30

Akash Thosar Video : ‘कोणत्याही वेळी... कोणत्याही ठिकाणी... बिस्ट मोड ऑन..’, असं कॅप्शन देत आकाश ठोसरने व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्याच्या ‘घर, बंदूक, बिरयानी’ या सिनेमाच्या सेटवरचा आहे.  

sairat fame parshya aka akash thosar share exersise video | एक नंबर भावा...! परश्याचा हा जबरदस्त VIDEO पाहून थक्क व्हाल

एक नंबर भावा...! परश्याचा हा जबरदस्त VIDEO पाहून थक्क व्हाल

Next

‘सैराट’मधील परश्याला विसरणं शक्य नाही. पण आता हा परश्या इतका बदललायं की, त्याला पाहून अनेकांना विश्वास बसत नाही. होय, आम्ही बोलतोय ते परश्याची भूमिका साकारणारा अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar) याच्याबद्दल. ‘सैराट’नंतर आकाश एका रात्रीत स्टार झाला. आता हे स्टारपद टिकून ठेवायचं तर मेहनत हवीच. आकाशने स्वत:वर, स्वत:च्या लुकवर प्रचंड मेहनत घेतली. आजही तो तितकीच मेहनत घेतोय. त्याचा ताजा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तो घेत असलेल्या मेहनतीची कल्पना येईल.

आकाशने  (Akash Thosar Video) त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर एक्सरसाईजचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत आकाश  जबरदस्त एक्सरसाईज करताना दिसून येत आहे.  

‘कोणत्याही वेळी... कोणत्याही ठिकाणी... बिस्ट मोड ऑन..’, असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्याच्या ‘घर, बंदूक, बिरयानी’ या सिनेमाच्या सेटवरचा आहे.  

आकाशच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी एकापेक्षा एक जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने त्याला ‘मराठीतील विद्युत जामवाल’ म्हटलं आहे. एका युजरने आकाशचा व्हिडीओ पाहून ‘चक्री जोर’ अशी कमेंट  केली आहे. कडक, भावा तूच रे, अशी प्रतिक्रिया अन्य एका चाहत्याने दिली आहे.

‘सैराट’ या पहिल्याच चित्रपटाने आकाशला अमाप प्रसिद्धी दिली. आजही लोक त्याला परश्या म्हणूनच जास्त ओळखतात. ‘सैराट’नंतर आकाश पुन्हा एकदा नागराज मंजुळे यांच्या ‘घर, बंदूक, बिरयानी’ या चित्रपटामध्ये दिसून येणार आहे.  नागराज मंजुळेच्या आटपाट प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या सिनेमात आकाश मुख्य भूमिकेत झळकणार आहे.  
अभिनेते सयाजी शिंदे यांचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.  नागराज मंजुळेही या फिल्ममध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा आणि पटकथा हेमंत अवताडे यांनी लिहिली आहे. ए.व्ही.प्रफुलचंद्र्र यांनी संगीत दिलं आहे.

Web Title: sairat fame parshya aka akash thosar share exersise video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app