सई ताम्हणकरची 'दुनियादारी'!,अभिनेत्री मराठी सिनेइंडस्ट्रीतील मित्रमंडळींना करतेय मिस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 12:34 PM2021-05-05T12:34:15+5:302021-05-05T12:34:56+5:30

सई ताम्हणकरने नुकताच इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत या कलाकारांना मिस करत असल्याचे सांगितले आहे.

Sai Tamhankar's 'Duniyadari'! Actress miss this actor | सई ताम्हणकरची 'दुनियादारी'!,अभिनेत्री मराठी सिनेइंडस्ट्रीतील मित्रमंडळींना करतेय मिस

सई ताम्हणकरची 'दुनियादारी'!,अभिनेत्री मराठी सिनेइंडस्ट्रीतील मित्रमंडळींना करतेय मिस

Next

अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून आपल्या चाहत्यांना अपडेट देत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत सिनेइंडस्ट्रीतल्या फ्रेंड्सना मिस करत असल्याचे सांगितले आहे.


सई ताम्हणकर हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की मेजर मिसिंग. या फोटोत अभिनेता अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, ती आणि अभिनेता व दिग्दर्शक संजय जाधव पहायला मिळतो आहे. ती या सर्वांना खूप मिस करत असून तिने मेरे यार असेही म्हटले आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळते आहे. सईने अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी आणि संजय जाधवसोबत दुनियादारी या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता.


सई ताम्हणकरचा जन्म २५ जून १९८६ रोजी सांगलीत झाला. 'या गोजिरवाण्या घरात' मालिकेतून सईने टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले. 'अनुबंध', 'अग्निशिखा', 'तुझं माझं जमेना', 'साथी रे' या मालिकांमध्येही तिने काम केले आहे. 'सनई चौघडे' या चित्रपटाने सईचे आयुष्य बदलले. या चित्रपटाने तिला मराठी चित्रपटसृष्टीत नाव मिळवून दिले.
मराठीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून सई प्रसिद्ध आहे. 'नो एण्ट्री पुढे धोका आहे' चित्रपटातील बिकिनी सीनमुळे सई बरीच चर्चेत आली होती.हिंदी चित्रपट 'हंटर'मध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकण्यापूर्वी सईने आमिरच्या 'गजनी' या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली होती.


'दुनियादारी', 'सौ. शशी देवधर', 'बालक पालक', 'टाइम प्लीज', 'तू ही रे', 'वजनदार', 'वायझेड', 'क्लासमेट्स', 'धुरळा' यांसारख्या अनेक चित्रपटांतून सईने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sai Tamhankar's 'Duniyadari'! Actress miss this actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app