सई सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. सई सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या नेहमीच संपर्कात असते. फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. बोल्ड आणि बिनधास्त अशी सईची ओळख आहे. शुक्रवारी सईचा गर्लफ्रेंड हा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकला. सईनं सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो शेअर केले आहे. या फोटोतील सईचा हॉट आणि सेक्सी अंदाज कुणालाही नक्कीच घायाळ करेल.

या फोटोमध्ये सईने फ्लॉरल डिझाईनचा शॉर्ट टॉप परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये सईचा अंदाज आणखीनच बोल्ड असल्याचे दिसून येत आहे. या आकर्षक आणि सेक्सी ड्रेससह तिने गर्लफ्रेंड चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली. तसं कॅप्शनच तिने या फोटोला दिले आहे. तिच्या या फोटोला रसिकांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. गर्लफ्रेंड चित्रपटात सईने अमेय वाघसोबत स्क्रीन शेअर केला आहे. 


केवळ रुपेरी पडद्यावरील अंदाजातच ती बोल्ड आहे असं नाही तर तिची मतं परखड आणि स्पष्टपणे मांडण्यातही सई तितकीच बोल्ड आणि बिनधास्त आहे. चित्रपटसृष्टीत आणि भूमिकांमध्ये अभिनेत्रींच्या वर्चस्वाबाबत तिने आपली ठाम मतं मांडली होती.स्त्रीप्रधान भूमिका असो किंवा एखादी बोल्ड भूमिका प्रत्येक भूमिकेत अभिनेत्री वरचढ ठरत असल्याचे सईला वाटतं. कितीही आव्हानात्मक भूमिका किंवा एखादी सामर्थ्य तसंच प्रभावशाली भूमिका असली तरी तिला अभिनेत्री पूर्णपणे न्याय देत असल्याचे सईने म्हटले होते. 


सई लवकरच वैभव तत्त्वादीसोबत 'पाँडेचेरी' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात सईसह वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी झळकणार आहेत. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग पाँडेचेरीमध्ये करण्यात आले आहे.सचिन कुंडलकर आणु तेजस मोडक यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून हा एक कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट आहे.


याशिवाय सई ललित प्रभाकर आणि  पर्ण पेठेसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सई पहिल्यांदाच ललित सोबत काम करताना दिसणार आहे. सईने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तिचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. 

Web Title: Sai Tamhankar shares hot photo on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.