Sai Tamhankar Fans also Celebrated Her Birthday With Children | सईचे फॅन्ससुद्धा सुपरसही, आवडत्या अभिनेत्रीचा हटके पद्धतीने साजरा केला वाढदिवस
सईचे फॅन्ससुद्धा सुपरसही, आवडत्या अभिनेत्रीचा हटके पद्धतीने साजरा केला वाढदिवस

सई ताम्हणकर मराठी रसिकांची दिलों की धडकन म्हणून ओळखली जाते. तिची प्रत्येक अदा रसिकांना घायाळ करणारी अशी वाटते. सौंदर्य, अदा आणि उत्तम अभिनयाचा अनोखा मेळ सईमध्ये दिसत असल्याने रसिक तिचं तोंडभरुन कौतुक करतात. सईने आजवर विविध भूमिकांमधून रसिकांची मनं जिंकली आहेत. सईचा समाजकार्यामध्ये सक्रिय सहभाग असतो. आणि तिचा सई होलिक्स हा फॅनक्लबही सईचे हेच विचार पूढे घेऊन जात आहे.

सई ताम्हणकरच्या वाढदिवसानिमित्त दरर्षी सईहोलिक्स काही ना काही सामाजिक उपक्रम हाती घेतात. गेल्या तीन वर्षात त्यांनी महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये वृक्षारोपण करून सईचा बर्थडे साजरा केला होता. तर यंदा त्यांनी पुण्यातल्या सूमारे 100 गरजू मुलांना वह्या-पुस्तके, पेन्सिल अशा शालेयोपयोगी वस्तूंचे वाटप केले. सईच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात फिरत असलेल्या ‘सई बर्थडे ट्रक’ने गरीब मुलांना खाऊचे वाटप करून त्यांच्या आयुष्यात आनंद फुलवला.  

सईहोलिक्स ह्या उपक्रमाविषयीचा विचार मांडताना म्हणतात, “सई आपला वाढदिवस दिमाखात साजरा करण्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा त्याच पैशात सामाजिक कार्य करण्यावर भर देते. आणि सईचा हा विचार पूढे नेतच आम्ही फॅनक्लबनेही मग तिचा वाढदिवस सामाजिक कार्य करून साजरा करायचं ठरवलंय. म्हणूनच यंदा गरजू मुलांच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आनंद फुलवण्यासाठी आम्ही खाऊच आणि त्यांना आवश्यक असलेल्या भेटवस्तूंचे वाटप केले.”

 

 

अभिनेत्री सई ताम्हणकरने यावर प्रतिक्रिया देताना म्हणाली, “माझ्या टीमला सई बर्थडे ट्रकची कल्पना सुचली. हे माझे भाग्य आहे की, मला असा फॅनक्लब आणि अशी टीम मिळाली आहे. माझ्या विचारांचा आदर करून ते विचार असेलले फॅनक्लब असणे, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. आणि मी ही माझ्या चाहत्यांना आपल्या कामातून प्रेरणा देण्याचा नेहमीच प्रयत्न करत राहीन.”  


Web Title: Sai Tamhankar Fans also Celebrated Her Birthday With Children
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.