ठळक मुद्देअमेय देखील चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. तो एक प्रोड्युसर असून त्याची लोडिंग पिक्चर्स नावाची कंपनी आहे. सई आणि अमेय हे दोघे एकाच क्षेत्रातील असले तरी या दोघांनी कधी एकत्र काम केलेले नाही.

सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने दुनियादारी, बालक पालक, वजनदार यांसारख्या मराठी चित्रपटात तर हंटर, गजनी यांसारख्या हिंदी चित्रपटातही खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने हिंदीमध्ये साकारलेल्या भूमिकांचे देखील तितकेच कौतुक झाले आहे. सईच्या अभिनयासाठी तिला आजवर अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.

सईचे फॅन फॉलोव्हिंग प्रचंड असून तिच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायला तिच्या फॅन्सना नेहमीच आवडते. सई सध्या सिंगल असली तरी तुम्हाला माहितेय का, तुमच्या लाडक्या सईचे लग्न झाले होते. सई आणि अमेय गोसावी यांचे लग्न १५ डिसेंबर २०१३ ला झाले होते. अमेय आणि सईने लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे कुटुंबीय, मित्रमैत्रीण चांगलेच खूश झाले होते. त्या दोघांनी ७ एप्रिल २०१२ ला साखरपुडा केला होता. साखरपुड्यानंतर ते दोघे लगेचच लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. पण सई कामात व्यग्र असल्याने तिने एक वर्षं लग्न पुढे ढकलले. त्यांनी मराठमोठ्या पद्धतीने लग्न केले होते.

अमेय देखील चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. तो एक प्रोड्युसर असून त्याची लोडिंग पिक्चर्स नावाची कंपनी आहे. सई आणि अमेय हे दोघे एकाच क्षेत्रातील असले तरी या दोघांनी कधी एकत्र काम केलेले नाही. सई आणि अमेय यांनी प्रेमविवाह केला होता. तीन वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न केले होते. सई आणि तिच्या पतीमध्ये सगळे काही सुरळीत सुरू आहे असाच तिच्या फॅन्सचा समज होता. पण त्या दोघांनी अचानक घटस्फोट घेतला. 

काही महिन्यांपूर्वी टाईम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने खूप साऱ्या गोष्टींवर मनसोक्त गप्पा मारल्या होत्या. या तिच्या मुलाखतीची चांगलीच चर्चा त्यावेळी रंगली होती. कारण याच मुलाखतीत तिने तिच्या घटस्फोटाविषयी सांगितले होते. अमेय आणि सईचे खूपच चांगले पटत होते. त्यांनी अनेकवेळा प्रसारमाध्यमांना एकत्र मुलाखतीदेखील दिल्या होत्या. अमेय तिला तिच्या प्रोफेशनमध्ये प्रचंड सर्पोट करत असल्याचे तिने अनेकवेळा सांगितले होते. त्यामुळे या बातमीमुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. 


Web Title: Sai Tamhankar Birthday Special: marathi actress sai tamhankar got divorced with husband amey gosavi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.