सई ताम्हणकर आणि शरद केळकर एकत्र झळकणार सिनेमात,जाणून घ्या सिनेमाविषयी खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 07:37 AM2017-12-13T07:37:15+5:302017-12-13T13:07:15+5:30

नावात काय आहे? असं सर्रास म्हटले जाते.पण नावात बरंच काही असतं विशेषतः आशयघन चित्रपटांच्या नावात ब-याच गोष्टी दडलेल्या असतात. ...

Sai Tamhankar and Sharad Kelkar will meet together in the movie. Learn about the special things about the movie | सई ताम्हणकर आणि शरद केळकर एकत्र झळकणार सिनेमात,जाणून घ्या सिनेमाविषयी खास गोष्टी

सई ताम्हणकर आणि शरद केळकर एकत्र झळकणार सिनेमात,जाणून घ्या सिनेमाविषयी खास गोष्टी

googlenewsNext
वात काय आहे? असं सर्रास म्हटले जाते.पण नावात बरंच काही असतं विशेषतः आशयघन चित्रपटांच्या नावात ब-याच गोष्टी दडलेल्या असतात. 'नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन' चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा बरोबर दिग्दर्शक समित कक्कड यांची ‘समित कक्कड फिल्म्स' आणि ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित 'राक्षस' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.सई ताम्हणकर आणि  शरद केळकर अशी नवीन जोडी प्रेक्षकांना ह्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. राक्षस नाव ऐकलं तरी अंगावर शहारे आणि मनात भीती दाटून येते.राक्षसाच एकच भयावह रूप आजपर्यंय आपण गोष्टींमध्ये ऐकलं आहे. नुकतंच ह्या चित्रपटाचं पहिल पोस्टर प्रदर्शित झाल आहे व प्रेक्षकांनी त्याला खूप चांगली पसंती दिली आहे. 


आदिवासी पाड्यांवर लहानपण गेलेल्या ज्ञानेश झोटींग यांचं 'राक्षस'च लेखन अनुभवसिद्ध असून त्यांनी त्यांचे लहानपणचे अनुभव चित्रपटाच्या कथेत अतिशय सुंदरपणे गुंफले आहेत. समित कक्कड यांनी आतापर्यंत एकाहून एक अशा सरस चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं आहे. निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून समित कक्कड यांचा 'आयना का बायना' हा पहिला चित्रपट असून तो सोनी मॅक्ससाठी हिंदीत डब होणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. शिवाय 'हाफ तिकीट' हा समित कक्कड यांचा दिग्दर्शक म्हणून दुसरा चित्रपट असून १५ निरनिराळ्या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्स' मध्ये या चित्रपटाची निवड झाली होती आणि आता 'राक्षस' चे ते प्रस्तुतकर्ते आहेत.राक्षस चित्रपटात ऋजुता देशपांडे, दयाशंकर पांड्ये, विजय मौर्य, याकूब सैद, पूर्णानंद वांदेकर, उमेश जगताप, विठ्ठल काळे,पंकज साठे, अनुया कळसकर, अनिल कांबळे, मकरंद साठे, जयेश संघवी, सविता प्रभुणे, साक्षी व्यवहारे, अभिजित झुंझारराव, सोमनाथ लिंबारकर इत्यादी कलाकारांच्या सुंदर अभिनयानं वेगळ्या आशयाच्या या चित्रपटाला योग्य तो न्याय दिला आहे.

निर्माता - दिग्दर्शक समित कक्कड म्हणाले, मागील काही दिवसांपासून विवेक कजारीया आणि मी एका चांगल्या प्रोजेक्टसाठी एकत्र येण्याचा विचार करत होतो. ‘राक्षस‘ हा चित्रपट आम्हाला एका नव्या पर्वाच्या आरंभासाठी अतिशय योग्य वाटला. या ‘राक्षस’वर प्रेक्षकही भरभरून प्रेम करतील अशी अपेक्षा आहे.निर्मात विवेक कजारिया म्हणाले, ‘राक्षस’ हा चित्रपट आमही मनापासून बनविला आहे. दिग्दर्शक ज्ञानेश झोटींग यांनी कथेवर प्रचंड मेहनत घेतली आहे. शरद केळकर आणि सई ताम्हणकर यांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. ऍन्ड्रू यांनी आदिवासी जमातीचे संगीत अतिशय तरल पद्धतीने या सिनेमात जिवंत केले आहे. मराठी चित्रपटात एक वेगळा प्रयोग ‘राक्षस’च्या निमित्ताने घडवून आणता आला याचा मला आणि निलेश नवलखा यांना आभिमान वाटतो. दरम्यान या चित्रपटाच्या प्रभावी पोस्टर मुळे चित्रपटाविषयी उत्कंठा वाढली असून, २३ फेब्रुवारीला 'राक्षस' रसिकांच्या भेटीला येणार आहे.



Web Title: Sai Tamhankar and Sharad Kelkar will meet together in the movie. Learn about the special things about the movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.