या दिवशी सचिन पिळगांवकर, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे यांचा प्रदर्शित होणार 'लव्ह यु जिंदगी' हा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 08:00 AM2018-11-21T08:00:00+5:302018-11-24T11:31:31+5:30

'लव्ह यु जिंदगी’च्या निमित्ताने सचिन पिळगांवकर, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे हे तिघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये त्यांचा नवा लूक आपण पाहू शकतो.

Sachin Pilgaonkar, kavita lad and prarthana behere starter love you zindagi marathi movie will released on 11th January | या दिवशी सचिन पिळगांवकर, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे यांचा प्रदर्शित होणार 'लव्ह यु जिंदगी' हा चित्रपट

या दिवशी सचिन पिळगांवकर, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे यांचा प्रदर्शित होणार 'लव्ह यु जिंदगी' हा चित्रपट

googlenewsNext
ठळक मुद्देम जरी जिंदगी वर असलं तरी त्याची परिभाषा ही दोन्ही वयोगटात कशी वेगळी असते हे या टीझरमध्ये दाखवण्यात आले असून सचिन पिळगांवकर, प्रार्थना बेहरे, कविता लाड यांच्या अभिनयाची झलक आणि काही गमतीदार किस्से या टीझरमध्ये पाहायला मिळाले होते. 'लव्ह यु जिंदगी' या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देखील दिला होता. प्रेक्षकांच्या नवीन वर्षाची सुरुवात एकदम हटके आणि इंटरेस्टिंग करण्यासाठी हा चित्रपट ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

तारुण्य पुन्हा एकदा जगण्याची इच्छा असणाऱ्या अनिरुद्ध दातेचा म्हणजेच अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या 'लव्ह यु जिंदगी' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. प्रेम जरी जिंदगी वर असलं तरी त्याची परिभाषा ही दोन्ही वयोगटात कशी वेगळी असते हे या टीझरमध्ये दाखवण्यात आले असून सचिन पिळगांवकर, प्रार्थना बेहरे, कविता लाड यांच्या अभिनयाची झलक आणि काही गमतीदार किस्से या टीझरमध्ये पाहायला मिळाले होते. 

लव्ह यु जिंदगी' या चित्रपटाचा टीझर पाहिल्यावर हे लक्षात येते की, सचिन पिळगांवकर साकारत असलेल्या अनिरुद्ध दाते या व्यक्तिरेखेचे वयाच्या बाबतीत फारच वेगळे मत आहे. जसे की, ते त्यांच्या वाढत्या वयाच्या सत्याला स्वीकारण्यास तयार नसून आपण आजही ते तारुण्य अनुभवू शकतो, त्याच उत्साहाने मनमौजी आयुष्य जगू शकतो असे त्यांना वाटते आणि म्हणूनच पुन्हा एकदा तारुण्य जगण्यासाठी त्यांची असलेली धडपड चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

'लव्ह यु जिंदगी' या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देखील दिला होता. प्रेक्षकांच्या नवीन वर्षाची सुरुवात एकदम हटके आणि इंटरेस्टिंग करण्यासाठी हा चित्रपट ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 
'लव्ह यु जिंदगी’च्या निमित्ताने सचिन पिळगांवकर, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे हे तिघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये त्यांचा नवा लूक आपण पाहू शकतो. हा लूक त्यांच्या आजवरच्या लूकपेक्षा नक्कीच हटके आहे.
 
कविता लाड यांनी मनोरंजनाच्या माध्यमातून त्यांच्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांनी देखील त्यांच्या प्रत्येक भूमिकेला मनापासून प्रतिसाद दिला आहे. नवीन वर्षात 'लव्ह यु जिंदगी’मुळे कविता लाड यांची नवी भूमिका आणि सचिन, कविता, प्रार्थना या तिघांचीही पहिल्यांदाच जुळून आलेली ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे.

एस. पी. प्रोडक्शन्स  प्रस्तुत, सचिन बामगुडे निर्मित 'लव्ह यु जिंदगी' या कौटुंबिक मनोरंजन करणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज सावंत यांनी केले आहे.

Web Title: Sachin Pilgaonkar, kavita lad and prarthana behere starter love you zindagi marathi movie will released on 11th January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.