या अभिनेत्रीच्या अदा पाहून अमृता खानविलकरला लागला ४४० व्होल्टचा झटका, म्हणाली 'सेक्सी', कोण आहे 'ती'?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 10:22 AM2020-12-15T10:22:31+5:302020-12-15T10:28:29+5:30

ऋतुजा बागवे सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋतुजा नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका,आगामी प्रोजेक्टस यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.

Rutuja Bagwe Caught Everyone Attention Amruta khanvilkar Comments On Her Super Sexy Photo | या अभिनेत्रीच्या अदा पाहून अमृता खानविलकरला लागला ४४० व्होल्टचा झटका, म्हणाली 'सेक्सी', कोण आहे 'ती'?

या अभिनेत्रीच्या अदा पाहून अमृता खानविलकरला लागला ४४० व्होल्टचा झटका, म्हणाली 'सेक्सी', कोण आहे 'ती'?

googlenewsNext

खरं तर एखाद्या अभिनेत्रीने दुस-या अभिनेत्रीची स्तुती करणे हे फार अभावानेच पाहायला मिळते. नेहमीच आपल्या ग्लॅमरस लूकमुळे कायम चर्चेत असणारी अभिनेत्री अमृता खानविलकर एका मराठमोळ्या अभिनेत्रीवर फिदा झालीय. अमृता फिदा असलेली अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून ती आहे अभिनेत्री ऋतुजा बागवे.

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री ऋतुजा बागवे सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. विशेष म्हणजे 'नांदा सौख्य भरे' मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर एंट्री करत रसिकांचे भरघोस मनोरंजन केले आहे.

सोशल मीडियावर ऋतुजा तिचे  सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घालायला सुरूवात केली आहे. चाहत्यांसह सेलिब्रेटी मंडळी देखील तिच्या लुक्सच्या प्रेमात पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. ब्लॅक रंगाच्या ड्रेसमधील फोटोतील तिच्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे. फॅन्सना स्टायलिश ड्रेसमधला तिचा  हा  अंदाज आवडला आहे. त्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

 

इतकंच काय तर अमृताही स्वतःला रोखू शकली नाही. त्यामुळेच की काय तिनेही 'सेक्सी' कमेंट करत पसंती दिल्याचे पाहायला मिळाले. सध्या ऋतुजाचा हा फोटो लक्षेधी ठरतो आहे. शेअर केलेल्या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ऋतुजाचे सर्वच फोटो सोशल मीडियावर काहीसे वेगळे ठरतात.

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला खतुजाच्या विविध अदा  कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे ऋतुजाचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋतुजा नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका,आगामी प्रोजेक्टस यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

Web Title: Rutuja Bagwe Caught Everyone Attention Amruta khanvilkar Comments On Her Super Sexy Photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.