Rohit Raut and Juilee Joglekar : रोहित राऊत-जुईली जोगळेकरच्या लग्नविधींना सुरूवात, जुईलीच्या ग्रहमख पूजेचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 02:32 PM2022-01-19T14:32:45+5:302022-01-19T14:33:28+5:30

Rohit Raut and Juilee Joglekar: सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

Rohit Raut and Juilee Joglekar: Rohit Raut-Juilee Joglekar's wedding rituals begins | Rohit Raut and Juilee Joglekar : रोहित राऊत-जुईली जोगळेकरच्या लग्नविधींना सुरूवात, जुईलीच्या ग्रहमख पूजेचे फोटो आले समोर

Rohit Raut and Juilee Joglekar : रोहित राऊत-जुईली जोगळेकरच्या लग्नविधींना सुरूवात, जुईलीच्या ग्रहमख पूजेचे फोटो आले समोर

googlenewsNext

सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. नुकतेच सुयश टिळक आणि आयुषी भावेचे लग्न पार पडले. त्यानंतर अभिनेत्री हृता दुर्गुळेचा प्रतीक शाहसोबत साखरपुडा पार पडला. आता लवकरच सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम गायक रोहित राऊत (Rohit Raut) आणि गायिका जुईली जोगळेकर (Juilee Joglekar) लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या त्यांच्या घरी लगीनघाई पाहायला मिळत आहे.

लग्नाआधीच्या पूजेच्या विधींना सुरूवात झाली असून जुईलीची ग्रहमख पूजा नुकतीच पार पडली. त्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. 

जुईली जोगळेकर आणि रोहित राऊत गेल्या काही दिवसांपासूनंच सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करून काउंटडाउन टाकताना दिसत आहेत. रिलेशनशीपमध्ये आल्यानंतर दोघांनीही एकत्र केलेली पहिला इव्हेंट म्हणत खास फोटो शेअर केला आहे. या कॅप्शनसोबत रोहिली आणि सिक्स डेज टू गो असे हॅशटॅग देखील वापरले आहेत. त्यामुळे २३ जानेवारीला हे दोघंही लग्न करणार असल्याची त्यांनी हिंट दिली आहे. या स्पेशल फोटोआधी देखील त्यांनी अनेक फोटो शेअर करत लग्नासाठीचे काउंटडाउन सुरु केले आहे.


रोहित आणि जुईली गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असून अनेकदा ते सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी केळवणचे फोटोदेखील शेअर केले होते. आता त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Web Title: Rohit Raut and Juilee Joglekar: Rohit Raut-Juilee Joglekar's wedding rituals begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.