'सैराट'मुळं एका रात्रीत बदललं रिंकू राजगुरुचं आयुष्य, अशी दिली होती ऑडिशन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 06:00 AM2021-02-12T06:00:00+5:302021-02-12T06:00:00+5:30

रिंकू शाळेत असतानाच तिला सैराट हा चित्रपट मिळाला आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले.

Rinku Rajguru's life changed overnight due to 'Sairat', audition was given | 'सैराट'मुळं एका रात्रीत बदललं रिंकू राजगुरुचं आयुष्य, अशी दिली होती ऑडिशन

'सैराट'मुळं एका रात्रीत बदललं रिंकू राजगुरुचं आयुष्य, अशी दिली होती ऑडिशन

googlenewsNext

परश्या आर्ची आली आर्ची... हा डायलॉग कानावर जरी पडला तरी सैराट चित्रपटातील सीन डोळ्यासमोर उभा राहतो. सैराट चित्रपटाने व त्यातील परशा आणि आर्ची यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. या चित्रपटातून रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. सैराट रिलीज होऊन ४ वर्षे झाले असतानाही आजही रिंकू व आकाश यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहे.

रिंकू शाळेत असतानाच तिला सैराट हा चित्रपट मिळाला आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. सैराट चित्रपटासाठी ऑडिशनची जाहिरात आली होती. नागराज मंजुळे रिंकूच्या कुटुंबीयांच्या परिचयाचे होते. त्यांनी नागराज यांच्याशी संपर्क साधला आणि अकलूजमध्ये १६ डिसेंबर २०१३ रोजी रिंकूचे ऑडिशन पार पडले. तब्बल एक वर्षांनी तिची निवड झाल्याचे कुटुंबीयांना सांगण्यात आले.

सैराट चित्रपटासाठी ऑडिशन घेत असताना रिंकू राजगुरूचे अभिनय कौशल्य आणि तिचा आवाज ऐकून नागराज मंजुळेंनी तिची निवड केली. त्यावेळी रिंकू अवघ्या १३ वर्षांची होती. त्यावेळी इयत्ता सातवीत शिकणाऱ्या रिंकूने आपल्या कौशल्याने सगळ्यांची मने जिंकली. पण या चित्रपटातील आर्चीने प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर केले. 
सैराटसाठी रिंकू राजगुरु बुलेट आणि ट्रॅक्टर चालवायला शिकली. रिंकूला बुलेट चालवताना पाहून असंख्य मुली बुलेट शिकल्या. सैराटनंतर रिंकूने हिंदी आणि कन्नड या दोन्ही भाषेत काम केले. ‘सैराट’ चित्रपटासाठी रिंकू राजगुरुला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 


सैराटच्या यशानंतर तिला चांगल्या चित्रपटाच्या ऑफर्स आल्या. या सिनेमानंतर तिने कागर, मेकअप या चित्रपटात काम केले. तसेच ती लारा दत्तासोबत हिंदी वेबसीरिज हंड्रेडमध्येदेखील झळकली. नुकतीच ती अॅमेझॉन प्राइमवरील अनपॉज्ड या सिनेमातही पहायला मिळाली.


रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.याशिवाय रिंकू राजगुरू अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: Rinku Rajguru's life changed overnight due to 'Sairat', audition was given

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.