रिंकू राजगुरूची ही अदा पाहून व्हाल घायाळ, तिच्या सौंदर्याची होतेय सगळीकडे चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 01:05 PM2021-02-17T13:05:34+5:302021-02-17T13:06:26+5:30

रिंकूने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे.

rinku rajguru video viral on social media, looking stunning in the video | रिंकू राजगुरूची ही अदा पाहून व्हाल घायाळ, तिच्या सौंदर्याची होतेय सगळीकडे चर्चा

रिंकू राजगुरूची ही अदा पाहून व्हाल घायाळ, तिच्या सौंदर्याची होतेय सगळीकडे चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देरिंकूने या व्हिडिओत जांभळ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर साजेशे दागिने घातले आहेत. तसेच अतिशय छान मेकअप केला आहे आणि केसाची वेणी घातली आहे. ती या व्हिडिओत खूपच छान दिसत असून तिच्या या अदा तिच्या चाहत्यांना आवडत आहेत.

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच रिंकूने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रिंकूचा अंदाज पाहून तिचे चाहते घायाळ होत आहेत.

रिंकूने या व्हिडिओत जांभळ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर साजेशे दागिने घातले आहेत. तसेच अतिशय छान मेकअप केला आहे आणि केसाची वेणी घातली आहे. ती या व्हिडिओत खूपच छान दिसत असून तिच्या या अदा तिच्या चाहत्यांना आवडत आहेत. हा व्हिडिओ रिंकूने शेअर करून केवळ एक दिवस झाला असला तरी या व्हिडिओला दीड लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

रिंकूचा लूक गेल्या काही महिन्यात चांगलाच बदलला असून तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. ती गेल्या काही महिन्यात अधिक ग्लॅमरस झाली आहे. 

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा ॲमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. रिंकू राजगुरू शेवटची हंड्रेड या वेबसीरिजमध्ये झळकली होती. याशिवाय रिंकू राजगुरू अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: rinku rajguru video viral on social media, looking stunning in the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.