रिंकू राजगुरूने शेअर केला पोस्ट वर्कआउटनंतरचा फोटो, फोटो पाहून चाहते झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 01:14 PM2021-01-06T13:14:22+5:302021-01-06T13:14:49+5:30

रिंकू राजगुरूने नुकताच इंस्टाग्रामवर पोेस्ट वर्कआउटनंतरचा फोटो शेअर केला आहे.

Rinku Rajguru shared a photo after the post workout, fans were amazed to see the photo | रिंकू राजगुरूने शेअर केला पोस्ट वर्कआउटनंतरचा फोटो, फोटो पाहून चाहते झाले थक्क

रिंकू राजगुरूने शेअर केला पोस्ट वर्कआउटनंतरचा फोटो, फोटो पाहून चाहते झाले थक्क

googlenewsNext

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पोस्ट वर्कआउटनंतरचा आहे.  

रिंकू राजगुरूने नुकताच इंस्टाग्रामवर पोेस्ट वर्कआउटनंतरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत रिंकूमध्ये खूप बदल झालेला पहायला मिळतो आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे. 


सैराट चित्रपटानंतर रिंकूमध्ये खूप मोठा बदल पहायला मिळाला. तिने तब्बल २० किलो वजन घटविले आहे. महत्त्वाचं म्हणजे तिने वजन घटविण्यासाठी कोणताही ट्रेनर ठेवला नाही. तिची ट्रेनर व डाएटिशियन म्हणून तिच्या आईनेच पाहिलं. तिच्या आईनेच तिच्या खाण्यापिण्याची आणि तिच्या व्यायामाची काळजी घेतली. रिंकूला प्रत्येक गोष्टीत आईने मदत केल्याचं तिने सांगितलं आहे. या सगळ्याचा फायदा केवळ दोन महिन्यात तिने तब्बल वीस किलो वजन घटवल्याचंही तिने सांगितलं.


रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा अॅमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.

Web Title: Rinku Rajguru shared a photo after the post workout, fans were amazed to see the photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.