लॉकडाऊनमध्ये रिंकू राजगुरुने सोशल मीडियावर शेअर केला तिचा बोल्ड फोटो चाहते म्हणाले, कडक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 10:14 AM2020-05-04T10:14:32+5:302020-05-04T10:21:26+5:30

काही दिवसांपूर्वी रिंकूची हंड्रेड नावाची वेबसिरीजमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Rinku rajguru shared her bold photo on social media gda | लॉकडाऊनमध्ये रिंकू राजगुरुने सोशल मीडियावर शेअर केला तिचा बोल्ड फोटो चाहते म्हणाले, कडक

लॉकडाऊनमध्ये रिंकू राजगुरुने सोशल मीडियावर शेअर केला तिचा बोल्ड फोटो चाहते म्हणाले, कडक

googlenewsNext

अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. रिंकूने तिचा बोल्ड अंदाजातील फोटो शेअर आहे. या फोटोत रिंकूचा वेगळ्या अंदाज चाहत्यांनसमोर आला आहे. रिंकूच्या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्चा वर्षाव केला आहे. कडक, ब्युटीफुल,नाईस अशा कमेंटस रिंकूच्या फोटोवर आल्या आहेत. 

काही दिवसांपूर्वी रिंकूची हंड्रेड नावाची वेबसिरीजमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. विशेष म्हणजे लारा दत्तासह तिची केमिस्ट्री खूप चांगली जुळल्याचे पाहायला मिळत आहे. या वेबसिरीजमध्ये लारा दत्ता एसीपी सौम्या शुक्ला नावाची महिला पोलिसांची भूमिका साकारली आहे. स्विज्झर्लंड एकदा तरी पाहण्याचे स्वप्न उराशी बाळगणारी रिंकूला अचानक ब्रेन ट्युमरचा आजार होतो. आणि अगदी जगण्यासाठी कमी वेळ तिच्यासाठी असतो. अशात ती पोलिस इन्सपेक्टर बनलेली लारा दत्तासह काम करायला सुरूवात करते. 

सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिले नाही. या चित्रपटात आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू भलतीच भाव खाऊन गेली. 

Web Title: Rinku rajguru shared her bold photo on social media gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.