रिंकू राजगुरूचा हा हटके लूकमधील फोटो ठरतोय चर्चेचा विषय, दिला प्रेरणादायी संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 12:25 PM2020-08-21T12:25:07+5:302020-08-21T12:25:32+5:30

रिंकूचा चांगलाच मेकओव्हर झाला असून स्टायलिश रिंकू चाहत्यांना पाहायला मिळत आहे.

Rinku Rajguru Photo Looks Unique she has given Positive Message Through Her Post | रिंकू राजगुरूचा हा हटके लूकमधील फोटो ठरतोय चर्चेचा विषय, दिला प्रेरणादायी संदेश

रिंकू राजगुरूचा हा हटके लूकमधील फोटो ठरतोय चर्चेचा विषय, दिला प्रेरणादायी संदेश

googlenewsNext

सिने इंडस्ट्रीत एक उत्तम अभिनेत्री असल्याचे सिद्ध करणारी रिंकू राजगुरू आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग असते. कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते. विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. नेहमीच तिच्या  लूकमुळे  सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरत आहे. अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही. याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या रॉकींग अंदाजातील फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.

नेहमीच ती सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. सैराटमध्ये ग्रामीण भागातली तरुणी साकारणाऱ्या रिंकूच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली. आता तर रिंकूचा चांगलाच मेकओव्हर झाला असून स्टायलिश रिंकू चाहत्यांना पाहायला मिळत आहे.

नुकताच शेअर केलेला या फोटोतील रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे रिंकुचा हा फोटो काहीसा वेगळा ठरतो आहे. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.

गुलाबी रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला या फोटोत ती विनामेअकप दिसते. मेकअप असो वा नसो नॅचरल ब्युटी म्हणून ओळखली जाणा-या रिंकुला तिच्या या फोटोवर रसिकांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो. रिल लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्येही तितकीच बिनधास्त  आणि स्टायलिश आहे. तिच्या स्टाइल आणि फॅशनची कायमच चर्चा होत असते. विविध सोहळ्याला अनुसरुन आणि त्याला साजेशीच अशी रिंकुची स्टाईल असते.

Web Title: Rinku Rajguru Photo Looks Unique she has given Positive Message Through Her Post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.